आयकॉन ऑफ महाराष्ट्र गौरव पुरस्कार वसंत पोतदार यांना जाहीर
सोलापूर/ प्रतिनिधी
सोलापूर -- येथील टी. व्ही महाराष्ट्र या माध्यम समूहाने समाजातील विविध क्षेत्रातील नामवंत व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या मान्यवरांना आयकॉन ऑफ महाराष्ट्र गौरव पुरस्काराची घोषणा संचालक श्री. धनंजय शिंदे यांनी केली असून यात सोलापूर येथील सोनार समाज संस्थेचे अध्यक्ष तथा सेवा निवृत्त नायब तहसीलदार वसंत पोतदार यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना आयकॉन ऑफ महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ बुधवार दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी पाच वाजता होटगी रोड वरील बालाजी सरोवर सोलापूर येथे संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम प्रसिद्ध सरकारी वकील तथा राज्यसभा खासदर श्री. उज्वल निकम साहेब आणि अतिविशिष्ट मान्यवरांचे उपस्थित संपन्न होणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिला / पुरुष यांचा या लौकिक पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये सोलापूर चे वसंत पोतदार यांचा समावेश असून त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येतं आहे.