धर्मराय ममदापूर यांना करुनाड सहकार रत्न पुरस्कार
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
येथील प्रतिष्ठित *श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे अधिकारी व समाजसेवक श्री धर्मराय ममदापूर यांना हुबळी येथील ‘विश्व दर्शन’ या कन्नड दैनिकाने 2025 सालासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार *"करुनाड सहकार रत्न"*पुरस्कार प्रदान करण्यासाठी निवड केली आहे.
ज्येष्ठ विचारवंत असलेले ममदापूर हे सहकार भारती कर्नाटक जिल्हा समितीचे सदस्य विजयपूर लाईन्स परिवाराचे सदस्य**, आदर्श नगर हनुमान मंदिराचे तसेच आदर्श नगर विकास मंडळाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय त्यांनी *अनेक सहकारी संस्थांची स्थापना केली असून, त्यांचे योगदान लक्षणीय आहे.
धर्मचिंतन आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या विशिष्ट कार्यशैलीने *निस्वार्थ सेवा बजावत असल्याबद्दल त्यांना या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
10 ऑगस्ट 2025, रविवार रोजी धारवाड येथील रंगायन येथे होणाऱ्या विश्व दर्शन’ कन्नड दैनिकाच्या 5व्या वर्धापन दिन समारंभात ममदापूर यांना हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार असल्याची माहिती दैनिकाचे संपादक *डॉ. एस.एस. पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे .