विजयपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘चड्डी गँग’चा सक्रिय
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
काही दिवसांपूर्वी विजयपूर जिल्ह्यात भीती निर्माण करणारी 'चड्डी गँग' पुन्हा एकदा सक्रीय झाली आहे. चड्डी गँगच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत.विजयपूर जिल्ह्यातील ताळिकोट शहरातील गणेश नगरमध्ये सहा जणांची एक टोळी फिरताना दिसली आहे.या टोळीतल्या चोरांच्या हातात घातक शस्त्रे — काठ्या, लोखंडी रॉड दिसल्या आहेत.गणेश नगरमधील एका घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.या चोरट्यांनी चेहऱ्यावर मास्क, अंगात बनियन व चड्डी घातली होती.चोरीचा प्रयत्न करत असताना, नागरिक जागे झाल्यामुळे आणि कुत्र्यांच्या सातत्याने भुंकण्यामुळे ते पळून गेले.ही टोळी ‘चड्डी गँग’ असू शकते किंवा ‘पारधी गँग’ असण्याची शंका स्थानिकांना आहे.रात्री अपरिचित लोक दिसल्यास पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, असे पोलीस विभागाचं आवाहन आहे.ताळिकोट पोलीस ठाणे किंवा जवळच्या कोणत्याही पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याची सूचना देण्यात आली आहे. ताळिकोट शहर परिसरात घर बांधलेल्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.