विजयपूरमध्ये ‘घरोघरी पोलीस’ उपक्रमाचा शुभारंभ
डिजिटल फसवणूके पासून सावध राहा - आयजीपी चेतनसिंग राठोड
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
शहरातील कंदगाल श्री हनुमंतराय रंगमंदिरात पार पडलेल्या समारंभात उत्तर विभागाचे आयजीपी चेतनसिंग राठोड यांनी ‘घरोघरी पोलीस’ या महत्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ केला या प्रसंगी बोलताना आयजीपी चेतनसिंग राठोड म्हणाले
"आज गुन्ह्यांचे स्वरूप डिजिटल झाले आहे. ‘डिजिटल अरेस्ट’च्या माध्यमातून लोकांना घाबरवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रकार वाढले आहेत. सोशल मीडियावर ‘हे व्हिडीओ टाका आणि पैसे मिळवा’, ‘घरी बसून कमवा’ अशा भूलथापा दिल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन त्यांनी केले
या नव्या योजने अंतर्गत प्रत्येक पोलीस बिट विभागातील सुमारे ४०-५० घरे निवडून, त्या घरोघरी पोलीस अधिकारी व कर्मचारी भेट देऊन नागरिकांचे म्हणणे ऐकतील. गुन्हेगारी नियंत्रण, सुरक्षितता, सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती आणि पोलीस विभागाकडून मिळणाऱ्या सेवा याची माहिती देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
पूर्वी नागरिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करत असत. आता पोलीसच नागरिकांच्या घरी येऊन संवाद साधतात, त्यामुळे पोलीस यंत्रणा अधिक मैत्रीपूर्ण होणार आहे
पोलीस घरी आले, तर त्यांच्याशी आपुलकीने बोलावे. ते तुमचे सहकारी आहेत, हे लक्षात ठेवावे." असे सांगितले
जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी म्हणाले,
"समाजाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस आवश्यक आहेत. डॉक्टर जसे रोगांवर उपचार करतात, तसेच पोलीस समाजातील गुन्हेगारी रोखण्यासाठी उपचार करतात.
लोकसंख्येनुसार पोलिसांची संख्या कमी आहे. त्यामुळे मीडिया आणि जनतेने पोलीस यंत्रणेचे डोळे आणि कान बनून काम करावे. धैर्य आणि त्याग हे पोलिसांसाठी आवश्यक आहेत. असे सांगितले
या प्रसंगी अडिवेप्पा सालगार जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्या पाहता आणखी दोन पोलीस ठाण्यांना मान्यता मिळावी, अशी मागणी आयजीपी यांच्याकडे केली.नगरसेवक प्रेमानंद बिरादार: "पूर्वी पोलीस गाडी आली की भीती वाटायची, आता पोलीस जनतेसाठी मैत्रीपूर्ण झाले आहेत. २४*७ काम करणाऱ्या पोलिसांच्या आोग्यासाठी विशेष योजना कार्यान्वित करण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली
जिल्हा युवक परिषद अध्यक्ष शरणू सबरद म्हणाले, "अपराधमुक्त जिल्हा बनवण्याच्या निर्धाराने पोलीस अधीक्षक २४*७ झटत आहेत. अनेक वेळा ते जेवायलाही वेळ न घेता डब्बा घेऊन काम करतात. नागरिकांनीही पोलीस विभागास सहकार्य करून गुन्हेगारी रोखण्यासाठी हातभार लावावा असे सांगितले
या प्रसंगी जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक रामनगौड हत्ती, शंकर मारीहाल, अधिकारी बसवराज यलगार, टी. एस. सुल्फी, मल्लय्या मठपती, नेते सैय्यद जैनुलाबुद्दीन, ॲड. मोहम्मद गौस हवालदार, सिद्धू रायण्णा, पांडूसाहुकार दोडमनी, इरफान शेख, विनोद मण्णूर इत्यादी उपस्थित होते.
सीपीआय मल्लय्य मठपती यांनी स्वागत केले, तर सीपीआय रवी यडवण्णावर यांनी सूत्रसंचालन केले.