लोकप्रिय समाजसेवक सुरेश पोटे यांना "समाज रत्न" पुरस्कार
मुंबई/ प्रतिनिधी
कोकण दीप मासिकाच्या २३ व्या वर्धापनदिनी सामाजिक कार्यकर्ते सुरेश पोटे यांना "समाजरत्न पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले. प्रा. सुरेंद्र गावस्कर सभागृह, मुंबई मराठी संग्रहालय इमारत, शारदा सिनेमा, जवळ दादर पुर्व मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला मा.ना.श्री.योगेश दादा कदम साहेब (राज्य मंत्री-गृह (शहरे) महसूल, ग्रामविकास आणि पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण व औषध प्रशासन विभाग) यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच सुधीर भाऊ कदम (शिवसेना संपर्क प्रमुख दापोली विधानसभा) हे कार्यक्रमाचे समारंभाध्यक्ष होते. संपादक सुकृत खांडेकर शिवाय प्रमुख पाहुणे व अनेक क्षेत्रातील निमंत्रित मंडळी व कोकणदीप चे संपादक दिलीप शेडगे ह्यांच्या उपस्थितीत हा सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.
