जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयानी विध्यार्थांकडून बेकायदेशीर रक्कम वसुली करू नये! अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा आग्रह धरू! - चंद्रकांत वेदपाठक
अक्कलकोट दि. 25 :- "*सोलापूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयानी शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट देताना काही ठराविक रक्कम बेकायदेशीर पणे वसुली करत असताना दिसून येत आहे, हे बेकायदेशीर कृत्य त्वरित थांबवावेत अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा प्रशासनाला आग्रह धरू* " असे निवेदन स्वराज्य माहिती अधिकार संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक व त्यांचे शिष्टमंडळाने मा. जिल्हाधिकारी व माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना दिले आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात अनेक शाळा, महाविद्यालयांनी सदर चे दाखले देताना विध्यार्थ्याकडून प्रत्येकी 200 रुपये वसुली केल्याची तक्रार पुणे शिक्षण संचालनाकडे दिली होती. त्याच प्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील अनेक शाळा, महाविद्यालये असेच बेकायदेशीर वसुली करीत असल्याची बाब उजेडात आली आहे. तसेच आरक्षित विध्यार्थ्यांना जात पडताळणी दाखला वेळेवर मिळत नाही त्यांची त्वरित सोय व्हावीत असे ही निवेदन स्वराज्य माहिती अधिकार संघटनेने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व माध्यमिक, उच्चमाध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना दिली आहे.
स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपकजी कांबळे, संस्थापक महासचिव कमलेश शेवाळे ( देवा सर), प्रदेश अध्यक्षा सौ. धनश्री उत्पात, विश्वस्त उमेश काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर चे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक, शहर अध्यक्ष विनोद भोसले, प्रभारी इफ्तेकर कामती कर व त्यांच्या शिष्टमंडळाने सदरचे निवेदन दिले यामुळे हजारो विध्यार्थ्यांचा फायदा होणार आहे.
निवेदन देताना जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक, शहर अध्यक्ष विनोद भोसले, विश्वस्त उमेश काशीकर, प्रभारी इफ्तेकर कामतिकार, कार्याध्यक्ष सुनील पंडित, माजी जिल्हा अध्यक्ष दिनेश काटकर, अशोक मैंदर्गीकर, संतोष पोतदार , दीपक कुरुलकर, दत्तगुरु वेदपाठक, किशोर बेजगम, सुधीर सलगर, सुनील बेंद्रे, गजानन सोनार, संतोष दीक्षित,अक्कलकोट शहर अध्यक्ष श्रीमती मिराबाई बुद्रुक, सौ. स्मिता पाठक, सौ. प्रेमलता वैध्य, आदि पदाधिकारी उपस्थित होते.
