भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी- विरभद्र पोतदार
मुंबई- येथील एन्टी करप्शन कमिटी अलियास भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे 27 वा वर्धापन दिन 23 जुन रोजी मुंबई मधील पश्चिम बोरीवली प्रबोधनकार केशव सीताराम नाट्यमंदिर येथील सभागृहात संपन्न झाला.
दुधनीचे सोलापूर 24तास न्युज चॅनेल चे संपादक विरभद्र पोतदार राष्ट्रीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदावर नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र द्विवेदी यांनी देऊन सन्मानित केले.
सर्व प्रथम मुंबई एन्टी करप्शन कमिटीच्या मुख्यालयातुन सकाळी आठ वाजता पदयात्रा निघाली त्यात समितीच्या दोनशे पेक्षा जास्त अधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते, ही पदयात्रा बोरीवली येथील प्रबोधनकार केशव सीताराम नाट्यमंदिर चामुंडा सर्कल पर्यंत काढण्यात आली. या कार्यक्रमात भारतातील आठशे पेक्षा जास्त जिल्ह्यातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष व कार्यकर्ते भ्रष्टाचार समुळ नष्ट करण्यासाठी उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांना विशेष प्राधान्य देण्यात आला. महाराष्ट्राचे वरिष्ठ पत्रकार उपेंद्र पंडित ( संपादक दैनिक मुंबई अमरदिप व समितीचे राष्ट्रीय मिडिया प्रभारी), सुरेश पाटील ( संपादक जनादेश वृत्तवाहिनी), दिनानाथ तिवारी ( संपादक मेट्रो दिनांक मिडिया), सलीम सैय्यद ( संवाददाता स्टार न्युज), व इतर पत्रकार व समाजसेवकांना स्वागत व सत्कार करण्यात आला. तसेच गरिब महिलांना साडी व विद्यार्थ्यांना वही, पुस्तक आणि कंपास देऊन शुभेच्छा दिल्या.
ह्या प्रसंगी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री रविंद्र द्विवेदी व राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष श्री आलोक द्विवेदी यांनी प्रथम व द्वितीय असे 29 पुरस्कार समितीचे सदस्यांना दिले. ज्यात अॅड. मोहम्मद सय्यद (राष्ट्रीय प्रवक्ता), उमेश द्विवेदी ( राष्ट्रीय महामंत्री), उर्मिल शहा ( राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी), हिदायत खान ( कर्नाटक अध्यक्ष), ललित कटारिया ( तामिळनाडू अध्यक्ष), श्री नदीमुल्लाह ( कार्यवाहक अध्यक्ष तामिळनाडू), रजाक शेख ( महाराष्ट्र अध्यक्ष), बाळासाहेब ईटप्पे ( प्रभारी महाराष्ट्र), निसार अहम्मद ( दक्षिण भारत अध्यक्ष), पुंडलिक घरत ( कोकण उपाध्यक्ष),महामंडलेश्वर डाॅ. प्रदिप बी फाले महामंत्री व अन्य वरिष्ठ पदाधिकारी यांना सत्कार करण्यात आला.
-------------------------------------------------------
भारताचे गरीब जनता, महागाई, व भारताचा विकास करण्यात सरकार असफल- रविंद्र द्विवेदी
भारतातील जनतेचा विकास होईना, गरिबांना न्याय मिळेना, महागाई थांबेना, गरिबांना सरकारी दवाखान्यात इलाज होईना, सरकारी दवाखान्यात सुविधा होईना, आणि सरकार दिवसेंदिवस नवनवीन घोषणा देण्याचे थांबेना! घोषणा तासंतास द्या परंतु विकासाचे काम कधी होणार, गरिबांना न्याय केव्हा मिळणार , बेरोजगारी कधी थांबेल,आणि भ्रष्टाचार कधी बंद होणार? त्यामुळे जनता केंद्र सरकारवर नाराज आहेत.
केंद्र सरकारने स्थानिक निवडणुका पुढे ढकलत चालली आहे, सरकारी शाळ्यात शिक्षणाची व्यवस्था नाही असे अनेक प्रश्न जनते समोर आहे म्हणून मी संपुर्ण भारताचे जनतेना, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मिळुन या भ्रष्टाचार विरोधात लढु असे घोषणा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री रविंद्र द्विवेदी यांनी केले.

