स्वराज्य च्या सोलापूर जिल्हा प्रभारी पदी इफतेकार कामतिकार यांची निवड
अक्कलकोट /प्रतिनिधी
स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या सोलापूर जिल्हा प्रभारी पदी सोलापूरचे सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध अडत व्यापारी इफ्तेकार कामतिकर यांची निवड करण्यात आली, त्याच बरोबर सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी अक्कलकोटचे चंद्रकांत वेदपाठक, तसेच सोलापूर शहर अध्यक्ष पदी विनोद भोसले यांची निवड करण्यात आली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे व संस्थापक महासचिव कमलेश शेवाळे (देवा सर ) यांनी स्वराज्य चौथ्या वर्धापन दिवशी ठाणे येथील कार्यक्रमात केली आहे, या निवडचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.
स्वराज्य चे चतुर्थ वर्धापन दिन ठाणे रेल्वे स्टेशन च्या बाजूला असलेल्या रेल्वे सभागृहात मोठया थाटात पार पडला.
या प्रसंगी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा सौ. धनश्रीताई उत्पात, विश्वस्त सौ. संगीता बोराडे, सौ सविता तावरे, उमेश काशीकर, प्रशांतजी निकम संचालक सुरेखा कोकरे, रविंद्रजी करंगुटकर, विशाल बोराडे, संदिप जाधव, वैशालीताई कांबळे, स्वराज्य चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक, जिल्हा प्रभारी इफ्तेकार कामतीकर,शहर अध्यक्ष विनोद भोसले, माजी समन्वयक सुनील पंडित, ( लाला ) इम्तियाज बागवान, सुनील बेंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा प्रभारी पदी इफतेकर कामतिकर यांच्या निवडीचे सोलापूर स्वराज्य चे पदाधिकारी प्रकाश चव्हाण, सत्तू भोसले, दत्तात्रय दळवी, वैशालीताई गोरे, स्मिता पाठक व अक्कलकोट स्वराज्य चे पदाधिकारी गुरुनाथ पोतदार, दिपक पोतदार, श्रीमती मीराबाई बुद्रुक, पंकज कोरेकर , काशिनाथ पोतदार सौ. वर्षाताई चव्हाण, गौरीशंकर चनशेट्टी, दयानंद बिडवे, बलभीम पवार, शिवलिंगप्पा संगापुरे, अप्पासाहेब धुमाळ आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.