Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

घर भाड्याने पाहण्याच्या बहाण्याने महिलेवर चाकू हल्या

Responsive Ad Here



विजयपूर जिल्ह्यातील मुद्धेबिहाळ येथील घटना 

घर भाड्याने पाहण्याच्या बहाण्याने महिलेवर चाकू हल्या

विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 






जिल्ह्यातील मुद्धेबिहाळ शहरातील साई नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून घर भाड्याने पाहण्याच्या बहाण्याने आलेल्या एका दुष्कृत्यकर्त्याने घरमालक स्त्रीवर प्राणघातक हल्ला केला आहे.

 तो व्यक्ती घर भाड्याने घेणार असल्याचे सांगून आला होता. घरात फक्त महिलाच आहेत हे खात्री करून, त्याने घर दाखवण्याची मागणी केली. घर तिसऱ्या मजल्यावर असल्याने, घरमालकीण घर दाखवण्यासाठी वर गेली. त्यांच्यापैकी एकजण घर पाहण्याच्या निमित्ताने वर गेला, तर दुसरा खाली उभा राहिला.

घराचे कुलूप उघडून आत पाऊल ठेवताच, त्या व्यक्तीने अचानक हल्ला केला. पहिला आघात होताच, घरमालकिणीच्या किंकाळ्या ऐकून तिची आई धावून आली. तिला वाचवण्याचा प्रयत्न करताच, आरोपीने तिच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

किंकाळ्यांचा आवाज शेजारच्या घरांपर्यंत पोहोचला आणि लोक धावत आले. ते पाहताच, खाली उभा असलेला दुसरा आरोपी पळून गेला. वर गेला असलेला आरोपी चाकू दाखवून, जवळ आल्यास भोसकून टाकीन अशी धमकी दिली.

परंतु, काही धाडसी तरुणांनी महिलेचा जीव वाचवण्यासाठी साहस करून त्या आरोपीला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले.

घटनेची माहिती मिळताच पीएसआय संजय तिप्परेड्डी, पोलीस कर्मचारी रमेश मदरी, प्रकाश पुजारी आणि संगय्या घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला.

हल्ला झालेली महिला, एम.जी.व्ही.सी. कॉलेजमधील हिंदी प्राध्यापिका सुमंगला अंगडी असल्याचे समजते. त्यांच्या डोळ्यांना, तोंडाला आणि इतर भागांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यांना प्राथमिक उपचारासाठी तालुका रुग्णालयात नेण्यात आले असून, पुढील उपचारांसाठी त्यांना बागलकोट येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

आरोपी आंध्र प्रदेशातील असल्याचे समजते असून, लुटीचा हेतू असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.