Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

सोनार कन्या भक्ती गुजरातीला आत्महत्येला प्रवृत् केल्याप्रकरणी त्यांच्या परिवारातील तिघांना फाशी द्या- चंद्रकांत वेदपाठक

Responsive Ad Here

 


 सोनार कन्या भक्ती गुजरातीला आत्महत्येला प्रवृत् केल्याप्रकरणी त्यांच्या परिवारातील तिघांना फाशी द्या-  चंद्रकांत वेदपाठक 







अक्कलकोट/ प्रतिनिधी- 

अक्कलकोट दि. 30:-- नाशिकच्या 37 वर्षाची विवाहित सोनार कन्या *भक्ती अथर्व गुजरातीला* न्याय द्या , तिने आत्महत्या केली की तिची हत्या झाली याची सखोल चौकशी होऊन तिचे सासरे, सासू व नवरा अश्या तिघांना फाशीची शिक्षा  द्या  " अशी जोरदार मागणी सोनार हक्क परिषदेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

    भक्ती ही सोनार समाजाची विवाहित सोनार कन्या आहे तर नवरा अथर्व हा गुजराती समाजाचा आहे, त्या दोघात प्रेम विवाह झाला आहे. त्यास एका मूल देखील आहे.

   गुजराती परिवार अति श्रीमंत असून ही भक्ती चा छळ होत होता, मानसिक त्रास, शारीरिक त्रास, अपमान, रोज दारू पिऊन मारहाण करणे,खच्चीकरण करणे आदी त्रासामुळे तिने कंटाळून या सोनार कन्येने आत्महत्या केल्याचे गंगापूर पोलिसाने नमूद केलेल्या गुन्ह्यात नोंद केली आहे.

     19 मे रोजी भक्तीने आत्महत्या केल्यानंतर सासू, सासरे व नवरा पळून गुजरातला जाण्याचा प्रयत्न केला. गुजरातच्या सीमेवर गंगापूर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.

     सोनार विवाहित कन्या भक्ती ला आत्महत्तेला प्रवृत्त केल्याबद्दल आरोपी नवरा अथर्व गुजराती,  सासू मधुरा गुजराती, सासरे योगेश गुजराती अश्या तिघांना पोलिसांनी अटक करून गंगापूर पोलिस ठाण्यात 123/2025, 108, 306,115, 352, 305 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

     हे भक्तीची आत्महत्या नसून खूण असल्याचे त्याची उच्च स्तरावर सविस्तर चौकशी होऊन गुजराती परिवारातील सासू, सासरे व नवऱ्याला फाशी ची शिक्षा व्हावी अशी मागणी  अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांचे मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात सोनार हक्क परिषदेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांनी मागणी केली आहे आहे. आणि या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. 

     सोनार समाजातील विवाहित कन्येबाबत अशी घटना घडल्याबद्दल राज्यातील सोनार समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.