तुकाराम पोतदार यांना "श्री संत शिरोमणी समाजभुषण" पुरस्काराने सन्मानित
सांगोला/ प्रतिनिधी
अक्कलकोट येथे बाळासाहेबांची शिवसेना ( शिंदे गट),सोनार हक्क परिषद जिल्हा सोलापूर व स्वराज्य पोलिस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना तालुका अक्कलकोट यांचे संयुक्त विद्यमाने तुकाराम पोतदार यांना श्री संत शिरोमणी समाजभुषण राज्यस्तरीय पुरस्कार जिल्हाध्यक्ष मनिशजी काळजे यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आला.
तुकाराम पोतदार यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक, राजकीय, उद्योजक, शैक्षणिक, व मित्र आप्तेष्ट कडुन अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
