अक्कलकोट तालुक्यात दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिबिर- तहसीलदार- विनायक मगर
जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत महसुल विभागाअंतर्गत मंडळ स्तरावर
" छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधन शिबिर "
अक्कलकोट- शहरातील व ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की दहावी- बारावी चा निकाल लागल्याने पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, पी एम किसान योजना, आर्थिक दुर्बलघटकांचे प्रमाणपत्र, EWS, नाॅनक्रिमीलेअर तसेच इतर शैक्षणिक दाखल्याची आवश्यकता असते .
सदरचे दाखले विद्यार्थ्यांना विहित वेळेत देणे आवश्यक आहे,त्यामुळे मा.जिल्हाधिकारीसो, सोलापूर यांनी आदेशीत केले आहे.
त्या अनुषंगाने अक्कलकोट शहर व ग्रामीण भागामध्ये दि. 16/05/2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधन शिबिर अभियान अंतर्गत दाखला विषयक शिबीर तालुक्यात एकुण दहा ठिकाणी आयोजन केले असल्याची माहिती तहसीलदार विनायक मगर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
सर्व नागरिकांनी शिबीर प्रसंगी उपस्थित राहुन शैक्षणिक दाखले प्राप्त करुन घेण्याची दक्षता घ्यावी.
शिबीराचे स्थळ व गाव खालीलप्रमाणे-
1) जुने तहसील कार्यालय अक्कलकोट
2) शेळके प्रशाला वागदरी
3) ग्रामपंचायत कार्यालय जेऊर
4) ग्रामपंचायत कार्यालय नागणसुर
5) नगरपरिषद मैंदर्गी
6) नगरपरिषद दुधनी
7) ग्रामीण विद्यालय चपळगाव
8) जि. प. प्रा. शाळा तडवळ
9) जि. प. प्रा. शाळा करजगी
10) तलाठी कार्यालय किणी