Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

लोकायुक्तांची धाड; एजंटांकडून 1.50 लाखांची बेकायदेशीर रक्कम जप्त

Responsive Ad Here



लोकायुक्तांची धाड;  एजंटांकडून 1.50 लाखांची बेकायदेशीर रक्कम जप्त






विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे  

 आरटीओ कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट झाल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. विजयपूर आरटीओ कार्यालयावर लोकायुक्त पोलिसांनी छापा टाकला असून, एकूण 26 एजंटांना ताब्यात घेण्यात आले आहे. या एजंटांकडून  सुमारे 1.50 लाख रुपयांची बेकायदेशीर रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम सामान्य नागरिकांकडून परवाना, नोंदणी हस्तांतरण आणि इतर कामांसाठी घेतली होती.

एस पी टी. मल्लेश यांच्या नेतृत्वाखाली ही धाड टाकण्यात आली, ज्यात डिवायएसपी सुरेश रेड्डी, सिद्धेश्वर, सीपीआय आनंद ठक्कण्णनवर आणि इतर कर्मचारी सहभागी झाले होते. आरटीओ वासिम बाबा आणि इतर आरटीओ अधिकाऱ्यांची चौकशी लोकायुक्त पोलीस करत असून, कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे.