भाजपाच्या पंचमसाली नेत्यांची यत्नाळ विरोधात टिका, तर कुडलसंगम श्रींची भूमिकेवर नाराजी
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
भाजपच्या पंचमसाली समाजाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन विजयपूर शहर आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ यांची पक्षातून निलंबित केल्यानंतर कुडळ संगम पीठाचे श्री बसव जय मृत्यूंजय स्वामी यांच्या पाठिंब्याबद्दल त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली तर निलंबित बसवनगौडा पाटील यत्नाळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
भाजप राज्याध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांच्या पाठिंशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे भाजपचे नेते विजूगौडा पाटील, संजय पाटील कनमडी , डॉ सुरेश बिरादार, भिमाशंकर हदणूर, रविकांत बगली, कासूगौडा बिरादार, संदीप पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.
पंचमसाली समाजाचे नेते संजय पाटील कनमडी यांनी, "आम्ही भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असून, हिंदुत्वाचे पालन करणारे आहोत. पण बसवनगौडा पाटील यांच्या पाठिंब्याचे समर्थन करणारे पंचमसाली स्वामी हिंदुत्वाचे उल्लंघन करीत आहेत," असे सांगून ते म्हणाले श्री स्वामीजींनी स्वतः कधी हिंदू म्हणून उल्लेख केला नाही एवढेच नव्हे तर हिंदू धर्म आचारणावर टिका केली तसेच हिंदू धर्मात फूट पाडण्यासाठी स्वतंत्र लिंगायत धर्माची स्थापना करण्यात यावे अशी मागणी करीत झालेल्या आंदोलनात पुढाकार घेतला होता, तसेच सहकारी क्षेत्रातील निवडणुकीत माझ्या पराभवास बसवनगौडा पाटील हेच कारणीभूत असल्याचे सांगितले
विजूगौडा पाटील म्हणाले, कुटुंब राजकारण व समझोता राजकारणावर टिका करणारे बसवनगौडा पाटील यांनीच अनेक वेळा काॅग्रेस नेते, जिल्हा पालकमंत्री एम बी पाटील यांच्याशी हातमिळवणी करून पक्ष विरोधी कार्य केल्यामुळे पक्षाचे नुकसान झाले आहे असे सांगून यत्नाळ यांच्या निलंबनाचे समर्थन केले.
