यत्नाळ निलंबनाच्या विरोधात 11मे रोजी विजयपूरात राज्यस्तरीय समावेश
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
शहर भाजपाचे विद्यमान आमदार, माजी केंद्रीय मंत्री बसवनगौडा पाटील यत्नाळ यांच्या निलंबनाच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येणार असून त्याचाच एक भाग म्हणून दि. 11 मे रोजी विजयपूरात राज्यस्तरीय भव्य समावेश आयोजित करण्यात आले असल्याची माहिती कुडलसंगम पंचम साली पीठाचे जगद्गुरु बसवजय मृत्युंजय स्वामीजींनी दिली.
शहरातील राणी चंन्नम्मा सभा भवनात झालेल्या पूर्वभावी सभेनंतर बोलताना ते म्हणाले, राष्ट्रीय राॅली या नावाने भव्य समावेश आयोजित करण्यात येणार असून राज्यातील विविध जिल्ह्यांतून आठ ते दहा हिंदू अभिमानी, बसवनगौडा पाटील यांचे समर्थक, पंचम साली समाज बांधव सहभागी होतील असा अंदाज आहे. सर्व जिल्ह्यात, गावागावात बसवनगौडा पाटील यांच्या समर्थनार्थ निदर्शने, आंदोलन द्धारे जन जागृती करुन भाजपाच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांचे लक्ष वेधून घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
