काशीनाथ पोतदार यांना विश्वकर्मा समाज सेवारत्न पुरस्कार जाहीर
सोलापूर/ प्रतिनिधी
सोलापूर- अखिल सोनार समाज प्रतिष्ठान व सोनार हक्क परिषद (महाराष्ट्र राज्य ) यांच्या संयुक्त विद्यमाने काशीनाथ पोतदार यांना विश्वकर्मा समाज सेवारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
काशीनाथ पोतदार यांचा जन्म अक्कलकोट मध्ये झाला असुन लहानपणापासून समाज सेवा, व राजकारण या क्षेत्रात त्यांनी आवडीने काम करत आहेत.समाज सुधारणा, विश्वकर्मा जयंती, संतशिरोमणी नरहरी सोनार जयंती व समाधी दिन, मौनेश्वर उत्सव, कालीका जयंती असे अनेक संत महंताचे कार्यक्रम करणे यांचा छंद आहे, त्याच बरोबर समाजातील सुशिक्षित मुलांना नोकर्या लावुन देणे, बेरोजगारांना काम मिळवुन देणे, गरीब कुटुंबातील रुगणांना जात- पात न बघता शासकीय कोठ्यातुन रक्कम सुट मिळवुन दिले. इतके कार्य करताना त्यांना एकच वाटते की जनता हेच माझे विश्वकर्मा दैवत आहे आणि त्यांची सेवा करणे माझा धर्म आहे. तसेच काशीनाथ यांची ब्रिद वाक्य देखील आहे " जिंकु किंवा मरु समाजाच्या उत्तक्रांती करिता आमचा लढा सुरू "
काशीनाथ पोतदार यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजात , नातेवाईक, आप्तेष्ट व मित्र परिवार तर्फे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.