बी.एल.डी.ई विश्वविद्यालयाच्या कुलाधिपतीपदी बसनगौडा पाटील
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
विजयपुर
येथील प्रतिष्ठित बी.एल.डी.ई. (डिम्ड) विश्वविद्यालयाचे कुलाधिपती म्हणून बसनगौड एम. पाटील यांनी आज पदभार स्वीकारला.
बी.एल.डी.ई. संस्थेने 5 वर्षांच्या कालावधीसाठी 25 फेब्रुवारी रोजी बसनगौड एम. पाटील यांचे नाव नामनिर्देशन केले होते.
32 वर्षीय बसनगौड एम. पाटील हे उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांचे पुत्र असून, अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विश्वविद्यालयातून पदवी मिळवली आहे आणि जिनिवा स्कूल ऑफ डिप्लोमसीमधून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये डिप्लोमा पूर्ण केला आहे.
त्याआधी ते बी.एल.डी.ई. संस्थेच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य तसेच बी.एल.डी.ई. डिम्ड विश्वविद्यालयाच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत होते
या प्रसंगी समकुलपती डॉ. वाय. एम. जयराज, कुलपती डॉ. आर. एस. मुधोळ, रजिस्ट्रार डॉ. राघवेंद्र कुलकर्णी, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद पाटील, कायदा महाविद्यालयाचे डॉ. रघुवीर कुलकर्णी, डॉ. एस. व्ही. पाटील, डॉ. आर. एस. होण्णुटगी, डॉ. विजयकुमार कल्याणप्पगोळ, डॉ. आनंद पाटील, कायदेशीर सल्लागार सुरेश हक्की यांसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.