विक्रम गायकवाड यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
येथील भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते विक्रम स. गायकवाड यांची राष्ट्रीय मांग गारुडी क्रांती सेना संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय मांग गारुडी क्रांती सेनाचे राष्ट्रीय संस्थापक उत्तम शंकर मानकर व राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब कांता राखपाखरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विक्रम गायकवाड यांची पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी समाज संघटना मजबूत करण्याबरोबरच समाजाचा विकास, प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करावे अशी सूचना केली आहे.