Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

चडचाण येथे बिबट्याचा ३ व्यक्तींवर हल्ला

Responsive Ad Here




 चडचाण येथे बिबट्याचा ३ व्यक्तींवर हल्ला

वन विभागाच्या कार्यवाहीमुळे बिबट्याचा  जेरबंद 

 




विजयपूर/ प्रतिनिधी-  

जिल्ह्याच्या चडचाण तालुक्यातील मणंकलगी गावातील तलावाजवळ जक्कप्पा उटगी यांच्या द्राक्ष बागेत बिबट्या दिसला. 

शुक्रवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास मणंकलगी गावातील शेतकरी कल्लप्पा क्वाटाळे यांच्या वर बिबट्या ने हल्ला केला. त्यानंतर सुमारे ५० किमी परिसरातील गावातील लोकांनी पोलिस व वन विभागाला फोन करून हल्ल्याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळाल्यावर झळकी पोलिस ठाण्याचे पीएसआय एस.बी. पाटील यांनी वन विभागाला संपर्क साधून तातडीने घटनास्थळी येण्याचे सांगितले. झळकी पोलिस, वन अधिकारी, बरडोल आणि हलसंगी गावातील गोल्लारांचा मदतीने बिबट्याला पकडण्यासाठी कार्यवाही सुरू केली. ४ ते ५ तास बिबट्या पकडण्यासाठी प्रयत्न केले. अखेर बिबट्या  बागेतून ३ लोकांवर हल्ला करून द्राक्ष बागेत लपला होता त्यानंतर हलसंगी गावातील युवकांच्या सहकार्याने बिबट्या जेरबंद करण्यात यश मिळविले 

बिबट्या च्या हल्ल्याचा शिकार झालेले व्यक्ती म्हणजे संतोष तांबे, ईराणा मेत्री, गोटाल आणि महादेव यादववाड मणंकलगी यांच्यावर हल्ला केला आहे.

 


मणंकलगी, लोणी बी.के., तड्डेवाडी, हलसंगी, गोत्याळ, एळगी या गावांतील शेकडो लोक भितीने घर बंद करून घरात बसून होते चार ते पाच महिन्यांपासून बिबट्या या परिसरात वावर होता  असे सांगितले जात होते 

 परंतु आज ग्रामस्थांनी पोलिस आणि वन विभागाच्या मदतीने हलसंगी, बरडोल आणि गोल्लार युवकांच्या प्रयत्नामुळे बिबट्यास पकडण्यात आले 

यावेळी मणंकलगी गावातील सदस्य हणमंत कोळी, नागनाथ बिरादार, सोमशेखर मालबागी, रुद्रू लोणी, विठ्ठल वडगांव यांच्यासह हलसंगी आणि बरडोल गावातील गोल्लार युवकांनी जेरबंद करण्यात सहकार्य करणाऱ्या व्यक्तींना  सन्मानित करण्यात आले 


महसूल निरीक्षक चडचाण झळकी पोलिस ठाण्याचे पीएसआय एस.बी. पाटील, ग्राम प्रशासन अधिकारी चिदानंद डत्ती, गणेश पाटील पंचायत कर्मचारी आणि वन विभागाचे कर्मचारी तसेच पोलिस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.