Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

हयातबाबा यात्रा ची तारीख ठरली

Responsive Ad Here

 हयातबाबा यात्रा ची तारीख ठरली


तीन दिवसात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन 






अक्कलकोट / प्रतिनिधी- प्रविणकुमार बाबर 

           तालुक्यातील सांगवी बु येथील ग्रामदैवत हयातबाबा यात्रेची तारीख दरवर्षी प्रमाणे गुडीपाडवा च्या मुहूर्तावर यात्रेची तारीख निश्चित करण्यात येते.  

         गुडीपाडवा चे औचित्य साधून आज सकाळी ठीक 9 वाजता हयातबाबा दर्गा समोर गावकरी व यात्राकमिटी यांच्या बैठकी दरम्यान 16,17,18 अशी तीन दिवस यात्रेची तारीख ठरली असून, 16 रोजी संदल, 17 ला चिराग, 18 ला कुस्ती व महाप्रसाद असे ठरले आहे. 

          ग्रामदैवत ह्यातबाबा ची यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी होते. शिवाय या यात्रेला खूप भाविक भक्त मोठ्या भक्ती भावाने या यात्रेला आवर्जून उपस्थित राहतात. 

       या बैठकीला सरपंच बाळासाहेब भोसले, माजी सरपंच अबूबकर शेख, पोलीस पाटील शुभांगी बाबर, तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप सलबत्ते, प्रविण घाटगे, गणेश मोरे, इरफान शेख, पत्रकार प्रविणकुमार बाबर, सुभाष रेड्डी, यतिराज भोसले, राम माने, बबन गायकवाड, निवृत्ती रेड्डी, यात्रा कमिटी चे जाकीर कागदे, अबूबकर बाशा शेख, नबीलाल शेख, शालोद्दीन शेख, खाजोद्दीन शेख, मौला चाबुकस्वार, खासीम मुजावर, बालाजी रेड्डी,  हाजीमलंग मुजावर, सुभेदार कागदे, ताजोद्दीन कागदे, सैपन शेरीकर, मैनोद्दीन कागदे, करीम कागदे, हनीफ शेख, शहाजन शेख, आदम शेख, रफिक शेख, अशपाक शेख, अब्बास पटेल, जमीर शेख,  पाचूलाल शेख, हसन बिचकुते, जिलानी मुल्ला, रमजान मुल्ला,  महिबूब पठाण, जैनोद्दीन पठाण,चंदूलाल शेख, सत्तार पाटील, निसार पठाण, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

         या यात्रेसाठी पंचक्रोशीतील भाविक भक्त उपस्थित राहण्याचे आवाहन हयातबाबा यात्रा कमिटी कडून करण्यात आले आहे.