Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

कृष्णा नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेलेल्या तीन मुले बुडाले, एकाच शव सापडला

Responsive Ad Here


कृष्णा नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेलेल्या तीन मुले बुडाले, एकाच शव सापडला 






विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

आलमटी जलाशयाच्या पुढील भागात रेल्वे पुलाचा खालील कृष्णा नदीच्या पात्रात नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या दिवशी आंघोळीसाठी गेलेल्या तीन मुले वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यापैकी एकाचे शव सापडले असून इतर दोघांचा शोधकार्य सुरू आहे.

 हे तिघेही बागलकोट तालुक्यातील इल्याळ गावातील असून सोमशेखर बोमण्णा देवरमनी (वय१५) याचा शव सापडला आहे तर मल्लप्पा बसप्पा बगली (वय १५), परनगौडा मल्लप्पा बिळगी (वय१७) यांची कृष्णा नदीच्या पात्रात शोधकार्य सुरू आहे.

 घटनेची माहिती मिळताच बागलकोट अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, मच्छीमारांच्या सहकार्याने शोधकार्य सुरू करून एकाच शव शोधून काढण्यात आले.

  बागलकोट तालुक्यातील सितीमनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून घटनास्थळी बागलकोट सीपीआय एच.आर.पाटील भेट देऊन पाहणी केली आहे.