विद्यार्थ्यांनी देशभक्ती बरोबरच पालकांचा आदर करावा - डॉ.जावेद जमादार
विजयपूर/ प्रतिनिधी - दिपक शिंत्रे
विद्यार्थ्यांनी देशभक्तीबरोबरच पालकांचा आदर करण्याची वृत्ती विकसित करण्याचे आवाहन एन एन एस राज्य सल्लागार समितीच्या सदस्य आणि राष्ट्रीय युवा पुरस्कारप्राप्त डॉ. जाविद जमादार यांनी केले
अक्कमहादेवी महिला विद्यापीठ सभागृह, विजयपुर येथे कर्नाटक राज्य एन.एस.एस. कोश, युवा सबलीकरण आणि क्रीडा विभाग, कर्नाटक महिला विद्यापीठ आयोजित राष्ट्रीय नैतिकता शिबिराच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ जमादार म्हणाले मुलांचा भविष्यासाठी पालक कष्ट करून प्रसंगी कर्ज काढून मुलाला उच्च शिक्षण देतात आणि परिणामी त्यांचा मुलगा परदेशात नोकरीला लागतो आणि करोडोंचा पगार मिळवतो. मात्र वृद्ध आई-वडील लक्ष देण्यास त्याच्याकडं वेळ नसतो, आई किंवा वडीलांच्या अंतिमसंस्कार वेळी सुद्धा न आल्याचे उदाहरण आहेत.अशी आपली मन:स्थिती नसावी, आई-वडील हाच खरा देव आहे, या देवाला कधीही दुखावू नये म्हणून त्याने भावनिकपणे सांगितले.
विद्यार्थ्यांनी आपल्या देशाची संस्कृती आणि चालीरीती जाणून घ्याव्यात, नवीन क्षेत्रांना भेट द्यावी आणि सर्व लोकांशी मैत्री वाढवावी. NSS उपक्रमातूनच माझी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख झाली असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले अक्कमहादेवी महिला विद्यापीठाचे कुलगुरू शंकर गौडा सोमनाळ म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना सेवा आणि परिश्रमाचे महत्त्व सांगून अनेक आतिथ्यशीलतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या विजयपुर जिल्ह्यात इतर राज्यांतील तरुण प्रतिनिधी आले आहेत हे पाहून आनंद वाटतो असे मत व्यक्त केले.
एनएसएस अधिकारी प्रा.अशोककुमार सुरापुर यांनी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या शिबिरातील उपक्रमांची माहिती दिली.
मूल्यमापन कुलगुरू प्रा.एच.एम. चंद्रशेखर म्हणाले की, एनएसएस शिबिरे हे सेवेची भावना, देशाची विविध संस्कृती आणि चालीरीती समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ आहे.
प्रा.विष्णुकुमार शिंदे, मल्लम्मा बच्चापुर इतर उपस्थित होते.