पत्रकारांनी कर्तव्याची जाणीव ठेवून कार्य करावे - रफी भंडारी
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
पत्रकारांनी त्यांच्या कर्तव्याची जाणीव ठेवून जबाबदारीने काम करावे. काही पत्रकारांच्या कृत्यांमुळे संपूर्ण पत्रकार समुदायाला बदनामी होत आहे. हे टाळण्यासाठी पत्रकार संघटनांनी कार्य करणे आवश्यक आहे, असे बेळगाव येथील राणी चन्नम्मा विश्वविद्यालयाच्या सिंडिकेट सदस्य, ज्येष्ठ पत्रकार रफी भंडारी यांनी मनोगत व्यक्त केले
शहरातील कंदगल हनुमंतराय रंगमंदिरात जिल्हा कार्यरत पत्रकार संघाच्या वतीने आयोजित 'साधकांना अभिनंदन समारंभ' आणि संघाची सर्व सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्घाटन करतांना ते बोलत होते.
कार्यरत पत्रकारांनी क्रियाशील राहावं, अलिकडे पत्रकार नसलेले लोक पत्रकार म्हणून वावरत आहेत, आणि त्यांना काही लोक प्रोत्साहन देत आहेत. हे थांबवले पाहिजे. पत्रकारिता क्षेत्रात काही सुधारणा होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले
जिल्हा वार्ता व प्रसिद्धी खात्याचे अधिकारी अमरिश दोडमनी, ज्येष्ठ पत्रकार सुशीलेंद्र नायक, आयएफडब्ल्यूजे राष्ट्रीय समिती सदस्य महेश शटगार, पत्रकार शशिकांत मेंडेगार, इर्फान शेख, संघाचे अध्यक्ष प्रकाश बेण्णूर, इत्यादींनी मनोगत व्यक्त केले.
माध्यम अकादमी पुरस्कार प्राप्त सुशीलेंद्र नायक, महेश शटगार, केयूडीब्ल्यूजे पुरस्कार प्राप्त शशिकांत मेंडेगार, अल्लमप्रभू मल्लिकार्जुनमठ, राणी चन्नम्मा विश्वविद्यालयाचे सिंडिकेट सदस्य म्हणून नियुक्त केले गेलेले रफी भंडारी, कार्यरत संपादक संघाचे नवीन जिल्हा अध्यक्ष इर्फान शेख यांना अभिनंदन पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
संघाचे मुख्य सचिव मोहन कुलकर्णी, सचिव अविनाश बिदरी, राज्य कार्यकारी नामनिर्देशित सदस्य के.के. कुलकर्णी, राज्य समितीचे विशेष आमंत्रित सदस्य कौशल्य पन्हाळकर, खजिनदार राहुल आपटे व इतर व्यासपीठावर उपस्थित होते
बाबुराव कुलकर्णी यांनी प्रार्थनागीतानी कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले संघाचे उपाध्यक्ष इंदुशेखर मणूर यांनी स्वागत केले. संघाच्या राज्य कार्यकारिणी सदस्य डि.बी.वडवडगी यांनी संघाच्या तीन वर्षांच्या कार्यप्रगतीचा अहवाल वाचन आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संघाच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्य बसवराज उळ्लागड्डी यांनी आभार मानले. समारंभानंतर संघाच्या सर्व सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली विजयपूर शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुका घटकाचे पदाधिकारी आणि सदस्य या सभेत उपस्थित होते.