Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

फेस्कॉमचे ज्येष्ठ नागरिक रंगले गाण्यात

Responsive Ad Here

 



 फेस्कॉमचे ज्येष्ठ नागरिक रंगले गाण्यात 






मुंबई/ प्रतिनिधी- सुरेश पोटे 

फेस्कॉम मुंबई प्रादेशिक विभागा तर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या आज दिनांक १९.०२.२०२५ रोजी डी. एस. हायस्कूल नवरे सभागृह येथे संगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

 या स्पर्धेच्या उदघाट्न  प्रसंगी  आण्णासाहेब टेकाळे, अध्यक्ष फेस्काॅम  तसेच  सुरेश पोटे, अध्यक्ष फेस्कॉम मुंबई - नवी मुंबई प्रादेशिक विभाग हे होते. ज्येष्ठ सल्लगार विजय औंधे, या स्पर्धेत फेस्कॉम मुंबई प्रादेशिक विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर नवी मुंबई मधील सुमारे १५० स्पर्धकांनी भाग घेतला. ही स्पर्धा दोन सत्रात संपन्न झाली.




 या स्पर्धेचे परीक्षक होते

  रूपक मोरे

 सौ. राजश्री कुलकर्णी 

 निवेदन सौ. प्रतिभा सराफ, फेस्कॉम मुंबई प्रादेशिक विभागाचे पदाधिकारी, कल्चरल  कमिटी चे सदस्य  संजय अंकलीकर  

श्रीराम शिवडेकर, सौ. लता पोवार, सौ.स्वाती फडके यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. 

 संजय अंकलीकर यांनी साउंड सिस्टीम ची जबाबदारी व्यवस्थित सांभाळली.

स्पर्धा उत्साहात व खेळीमेळीत च्या वातावरणात पार पडली. या नियोजनबद्ध स्पर्धेचे श्रेय  स्पर्धकांनी मुंबई प्रादेशिक विभाग अध्यक्ष  सुरेश पोटे यांना दिले.