नागणसुर अंगणवाडीत शिवजयंती साजरा
मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे - श्रीदेवी विभुते
अक्कलकोट/ प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील नागणसुर येथील 283 क्रमांक अंगणवाडीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करण्यात आला.अंगणवाडीतील लहान चिमुकले राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषा परिधान करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या वेळी अंगणवाडी सेविका मदतनीस पालक गावकरी उपस्थित होते.या श्रीदेवी विभुते मनोगत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित माहिती सांगितली व तसेच पुढे बोलताना म्हणाले की माँसाहेब जिजाऊने बालपणी शिवाजी महाराजांना चांगले शिकवण व संस्कार दिले. त्याचप्रमाणें मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे असे विभुते यांनी म्हणाले कार्यक्रम झाल्यानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.