बीएलडीई संस्थेच्या अध्यक्षपदाची मंत्री एम.बी.पाटील यांची बिनविरोध निवड
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
भारतीय लिंगायत विकास शैक्षणिक संस्थेचा २०२५-२०३० या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत उद्योगमंत्री एम. बी. पाटील हे अध्यक्षपदी यांची बिनविरोध निवड झाल्याचे माहिती निवडणूक अधिकारी अशोक एच. मलघाण यांनी दिली.
त्यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रात म्हटले आहे की, उद्योगमंत्री एम. बी. पाटील बी. एल. डी. ई. संस्थेचे अध्यक्षपदी पुन्हा एकदा बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच, उपाध्यक्षपदी माजी विधान परिषद सदस्य जी. के. पाटील, मुख्य सचिव म्हणून विधान परिषद सदस्य सुनीलगौडा पाटील हे निवडले गेले आहेत.
संस्थेचा कार्यकारिणी सदस्यपदांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाली असून नवीन कार्यकारिणी सदस्य म्हणून माजी आमदार सोमनगौडा पाटील (सासनूर), अशोक जी. वारद (सिंदगी), संगप्पा गुरप्पा सज्जन (विजयपूर), सिद्धरामय्या निजगुणय्या मठ वकील (विजयपूर), अमगोंड मदुगौडा पाटील (बिज्जरगी), बापुगौडा भीमनगौडा पाटील (शेगुणशी), डॉ. अनिलकुमार बापुगौडा पाटील (लिंगदळी), कुमार चंद्रकांत देसाई (जैनापुर), कल्लनगौडा काशीरायगौडा पाटील (तोरवी), वीरनगौडा शिवनगौडा पाटील (बबलेश्वर), महेश बापुगौडा पाटील (कुमठे) आणि बसनगौडा मल्लनगौडा पाटील (राहुल) यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी अशोक एच. मलघाण यांनी प्रसिध्दीपत्रात दिली.