Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

दरोडा प्रकरणी सांगली जिल्ह्यातील जत येथील तिघांना अटक

Responsive Ad Here



दरोडा प्रकरणी सांगली जिल्ह्यातील जत येथील तिघांना अटक






विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 दिनांक: 16 जानेवारी रोजी रात्री एक च्या दरम्यान चार दरोडेखोरांनी शहरातील जैनापुर लेआउट,  येथील एका घराचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि घराचा मालक संतोष कनाळ यांना चाकूने वार करून पहिल्या मजल्यावरून खाली पाडले. नंतर त्याच्या पत्नीच्या गळातील 15 ग्रॅम सोन्याचे सर हिसकावून घेऊन फरारी झाले होते या प्रकरणी भाग्यज्योती संतोष कनाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गांधीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला होता 


 जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक  शंकर मारिहाळ,  रमण गौडा हत्ती, डिएसपी.बसवराज यलीगर,   सुनील कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रदिप तलकेरी,  पीएसआय  राजू ममदापुर,  सोमश गेज्जी, विनोद पुजारी आणि कर्मचारी यांचा समावेश असलेले विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते 

या पथकाने कारवाई करीत 

. सुरेश विश्वल  मदुकर चव्हाण, 42 वर्षे, रा. एकता नगर जत जिल्हा सांगली,

सूरज तुळशीराम चव्हाण,वय 32 जत, जिल्हा  सांगली,  शहर

आकाश ऊर्फ अक्षय सुखदेव रावत (वय३१)   एकता नगर जत जिल्हा  सांगली  अटक करून  मा.न्यायालयात हजर करण्यात आले.  सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.