Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

इंचेगेरी मठास ज्येष्ठ अभिनेते दोड्डण्णा यांची सदिच्छा भेट

Responsive Ad Here

 


इंचेगेरी मठास ज्येष्ठ अभिनेते दोड्डण्णा यांची सदिच्छा भेट 





 विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते आणि कलाकार संघटनेचे अध्यक्ष दोड्डण्णा यांनी जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील अध्यात्मिक क्षेत्र इंचेगेरी मठास सदिच्छा भेट दिली. 


श्री रेवनसिद्धेश्वर श्रीगुरुनी त्यांचा सत्कार करुन आर्शिवाद दिला.

  या प्रसंगी बोलताना दोडृण्णा म्हणाले 

 'मोबाईलच्या अति वापरामुळे वाचन संस्कृती, वाचनाची आवड कमी होत आहे. प्रत्येकांनी वाचनाचा संकल्प केला पाहिजे. आजही माझ्या घरात बरीच पुस्तके आहेत.  आताही आम्ही दोघं पुस्तकं वाचतो.  अध्यात्मिक पुस्तके वाचन आणि अहंकार सोडल्यास आत्मसाक्षात्कार होतो असे सांगून ते म्हणाले  आताही मी आणि माझी पत्नी घर आणि मठांमध्ये कचरा काढतो असे सांगितले    

श्री समर्थ सद्गुरू माधवानंद प्रभूजींनी हाती घेतलेली सामाजिक क्रांतीची कार्य पाहून समाधान होते , असे सांगून दोडण्णा यांनी श्रीमठात सुरू असलेल्या धार्मिक , सामाजिक कार्याचे कौतुक केले.

याआधी स्वातंत्र्यसैनिक मुरुगोड महादेव आणि भाऊसाहेब आणि गिरिमलेश्वर महाराजांच्या मंदिरास भेट देऊन गादीचे दर्शन घेतले 

  काही काळ त्यांनी मठ, संत-महंतरांचं महत्त्व, गुरु महाराज आणि आध्यात्मिक विचार आणि अध्यात्मवादी, स्वातंत्र्यसैनिक मुरगोडा महादेव यांची स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाची भूमिका याविषयी चर्चा केली. 

यावेळी निर्माते माधवानंद शेगुनसी, अभिनेता दिग्दर्शक पत्रकार विश्वप्रकाश टी मलगोंड, मल्लिकार्जुन कालतिप्पी, प्रकाश कालतिप्पी, शंकरप्पा महाराज, मुकुंद मुरुगोड महाराज, निरंजन हिरेमठ, विवेकानंद अरळी, रमेश पुजारी आदी उपस्थित होते.