विजयपुरात आपटे कुटुंबीयांचे वार्षिक स्नेहसंमेलन
विजयपुर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
प्रतिवर्षी वेगवेगळ्या शहरातून आयोजित केले जाणारे समस्त आपटे कुटुंबीयांचे दोन दिवसीय स्नेहमेळावा स्वरूपातील संमेलन विजयपुर येथे अरेकरी या ठिकाणी असणाऱ्या आपटे फॉर्म हाऊस मधे अतिशय उत्साहाने संपन्न झाले. येथील जेष्ठ पत्रकार विनय आपटे यांचे सुपुत्र राहुलआपटे वार्ताहार व रोहित आपटे रोहन आपटे परिवाराकडे या संमेलनाचे यजमानपद होते या दोन दिवसाच्या संमेलनाचा शुभारंभ चित्पावन ब्राह्मण समुदायाचे परमदैवत भगवान श्रीदेव परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलाने झाला.प्रतिमेचे पूजन आपटे कुटुंबियांच्या संस्थेचे प्रमुख मुंबईचे आपटे यांच्या हस्ते झाले.या आप्त आपटे सेवा कार्य सेवा समितीद्वारा आयोजित संमेलनासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून आलेल्या पन्नासहून अधिक कुटुंबियांची आवर्जून उपस्थिती होती.
संमेलनाच्या प्रथम सत्रात दीपप्रज्वलन व भगवान परशुराम प्रतिमापूजनानंतर संमेलनासाठी उपस्थित असणाऱ्या आपटे परिवारांचा प्रमुखांचा परिचय कार्यक्रम पार पडला.त्यानंतर आपटे समुह संस्थेची वार्षिक सर्व साधारण सभा प्रमुखांचा उपस्थितीत अतिशय खेळीमेळीने पार पडली..त्यामध्ये संस्थेचा विस्तार व बळकटीकरणासाठी विविध ठराव संमत करण्यात आले.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात दुपारी विविध मनोरंजनाचा बहारदार संगीताचा कार्यक्रम तर अद्वितीय.अनेक बुजुर्गानी तरुणाला ही लाजवेल अशी गाण्याच्या तालावर ठेका धरून आपली कला सादर केली. विजयपुर येथील प्रसिद्ध गायक .मुबारक दफेदार आणि शिवानंद यांच्या दमदार सुष्याव्य गीतांचे सादरीकरण तसेच तबला वादक अनिल चव्हाण ह्यांच्या समर्थ सूत्र संचालनाने चांगलीच रंगत आणली.संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी प्रा.दीपक पटवर्धन ह्यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले.आपटे कुटुंबियांच्या ह्या दोन दिवसीय संमेलनासाठी विनय आपटे व त्यांच्या कुटुंबीयांनी खूपच परिश्रम घेतले.उत्तम नियोजन व आयोजन व कौटुंबिक जिव्हाळ्याने झालेल्या स्वागताने हे दोन दिवसांचे संमेलन संस्मरणीय ठरले.ह्या आनंददायी संमेलनाच्या आठवणी बरोबर घेऊन पुढील वर्षीच्या संमेलनाच्या प्रतीक्षेतच प्रतिभा आपटे अरुणा आपटे. विजय आपटे , उदय आपटे. संजय आपटे, दिपेंद्र आपटे , सुधीर आपटे ,सविता आपटे ,मीना गाडगीळ , विजय गाडगीळ प्रसाद आपटे ,प्राजक्ता आपटे रिद्धी आपटे , श्रावणी आपटे, श्रेयस आपटे, श्रद्धा आपटे सविता देवल, सचिन देवल. उपस्थित
