जिल्हाध्यक्ष रोहन आपटे, व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
विजयपूर /प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
विजयपुर जिल्हा ब्राह्मण संघाच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आलेल्या रोहन आपटे व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार चित्पावन ब्राह्मण संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शहरातील टिळक कन्या शाळेत झालेल्या या सत्कार समारंभात बोलताना नूतन जिल्हाध्यक्ष रोहन आपटे म्हणाले, ज्येष्ठ समाज बांधवांच्या मार्गदर्शनाखाली व युवकांच्या सहकार्याने ब्राह्मण समाजाच्या एकजूट व समाज प्रगतीसाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
या वेळी सकल ब्राह्मण समाजातील आजच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. येत्या काळातील ब्राह्मणांपुढील आव्हाने आणि समाधान या वर विजय पटवर्धन व इतरांना मनोगत व्यक्त केले
श्रद्धा आपटे हिला संस्कृत वक्तृत्व स्पर्धेत राज्य स्तरावर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्या वेळी तिने देवभाषा संस्कृत बद्दल, संस्कृत मध्ये भाषण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सेक्रेटरी मानसी भिडे यांनी स्वागत केले. अरूणदादा छत्रे यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा राधिका भिडे, गायत्री भिड, सई जोशी, निनाद जोशी श्रेया पाटणकर, तनया पाटणकर अदिती गोखले, आदित्य जोश तनुश्री छत्रे, प्रज्वल कोल्हटकर या गुणवंत विद्यार्थ्यांसह पत्रकार राहुल आपटे यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी चित्पावन ब्राह्मण संघाचे अध्यक्ष दीपक पटवर्धन श्रीपाद पाटणकर ,अनघा छत्रे, सुनील जोशी, स्मिता जोशी, अभय सखदेव, याचे सह मोठय़ा संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
