भूसंपादनमधून अधिकाऱ्याला काढून टाका
जामदा प्रकल्पग्रस्तांची चिपळूण पाटबंधारे कार्यालयावर धडक, आ. सामंत
यांच्याकडे तक्रार
रत्नागिरी/प्रतिनिधी – प्रशांत चव्हाण
राजापूर तालुक्यातील जामदा प्रकल्पग्रस्तांनी चिपळूण
येथील पाटबंधारे प्रकल्पातील बांधकाम विभाग कार्यालयावर धडक दिली. येथील
उपविभागीय अधिकारी जावेद इनामदार यांना भूसंपादन प्रक्रियेतून काढून
टाकावे अशी मागणी त्यांनी केली. तशी तक्रार आ. किरण सामंत यांच्याकडे
कडून तसा ठराव प्रजासत्ताक दिनी झालेल्या ग्रामसभेतही करुन घेतला.
राजापूर तालुक्यातील काजिर्डे गावातील ग्रामस्थांनी यापूर्वीच संबंधित
पाटबंधारे प्रकल्प कार्यालयातील अधिकारी इनामदार यांच्याविरोधात
सातत्याने दंड थोपटले होते. या अधिकाऱ्याला कार्जिडा भूसंपादनमधून काढून
टाकावे व एक चांगला अधिकारी द्यावा यासाठी जिल्हाधिकारी रत्नागिरी,
अधीक्षक अभियंता रत्नागिरी, कार्यकारी अभियंता चिपळूण व आ. सामंत यांची
भेट घेऊन तक्रार केली होती. यानंतर ग्रामसभेत ठराव करुन दि. २७ जानेवारी
रोजी इनामदार यांच्या चिपळूण येथील कार्यालयात धडक मोर्चा
प्रकल्पग्रस्तांनी आणला होता मात्र, पूर्व सूचना देऊनही त्यांनी
नेहमीप्रमाणे दांडी मारल्याने प्रकल्पग्रस्तांनी संताप व्यक्त केला.
संबंधित अधिकारी ग्रामस्थांची बैठक किंवा कोणतीही चर्चा न करता गावातील
काही लोकांच्या तालावर नाचत असून प्रकल्पग्रस्तांचे प्रचंड नुकसान करत
असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. गावातील प्रकल्पग्रस्तांच्या
मध्ये विनाकारण वाद, भूसंपादनाचे कोणतेही नियम माहित नसणे व लोकांच्या
समस्या न सोडविणारे हे अधिकारी असून त्यांना या प्रक्रियेतून काढून
टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत लोकायुक्त महाराष्ट्र राज्य, माननीय पोलीस अधीक्षक रत्नागिरी,
माननीय प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देऊन इनामदार यांची
विभागीय चौकशी लावण्यात येणार आहे. आठवड्यातून 1 दिवस कार्यालयात हजर
असणारे इनामदार 15 वर्षे काम पूर्ण करू शकणार नाहीत मग प्रकल्पावर
त्यानाच ठेवण्याचा प्रयत्न का केला जात आहे हा प्रश्न उपस्थित केला असून
इनामदार यांची उचलबांगडी न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार
प्रकल्पग्रस्तांनी घेतलेला आहे.
