Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

ऑनलाईन फसवणूक प्रकरणी रु १ कोटी ४७ लाख रुपये जप्त

Responsive Ad Here



ऑनलाईन फसवणूक प्रकरणी रु १ कोटी ४७ लाख रुपये जप्त - जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी





विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 ऑनलाइन फसवणूक विविध प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी  1,47,76,053 रु. जप्त करण्यात यश मिळाले असल्याची माहिती 

जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी पत्रकार परिषदेत दिली .याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, विजयपूर जिल्ह्यात  ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती डिजिटल अटक, स्टॉक मार्केट ट्रेडिंग, क्रिप्टो ट्रेडिंग अशा एकूण 12 गुन्हे विजयपूर सीईएन पोलीस ठाण्यात गेल्या 3 महिन्यांत नोंदवण्यात आले होते  या प्रकरणांच्या तपासासाठी विशेष तपास पथक तयार करून या प्रकरणाचा छडा लावण्यात या पथकाला यश आल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील सृष्टी कॉलनी येथील रहिवाशी  प्रा.शैलजा मुत्तीनपंडीमठ यांनी सीईएन पोलिस स्टेशनमध्ये  रु 38 लाख. ही फसवणूक झाल्याचे तक्रार नोंदवली होती, डिजिटल अटकेच्या स्वरूपात त्यांची फसवणूक झाली. सदर प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन आरोपींचे बँक खाते जप्त करण्यात आले व 31.52 लाख रुपये तक्रारदारास परत करण्यात आले, 

 जिल्ह्यातील तालिकोट येथील राज  कोंगोडी यांच्या कडून ८७ लाख रु.  रक्कम आरोपींनी ट्रेडिंग अप्लीकेशन नावाखाली  घेण्यात आली होती या तक्रारीवरून 

 आरोपीचे बँक खाते गोठवण्यात आले असून, 68.25 लाख रुपये तक्रारदाराला परत करण्यात आले आहेत.





अशाच आणखी एका प्रकरणात सिंदगी  येथील सॉफ्टवेअर इंजिनीअरचीही फसवणूक झाली होती. बाजारभावापेक्षा कमी किमतीत शेअर्स खरेदी करून दिली जातील असा सांगून रु 1 कोटी. आरोपींनी त्यांच्या खात्यात पैसे जमा करून घेतले होते. आरोपीचे बँक खाते जप्त करण्यात आले असून  ९.९७. लाखो रुपये परत देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील निखिला शिवानंद मोजी यांच्या कडून आंतरराष्ट्रीय डॉलरमध्ये गुंतवणूक व दरोरोज शेकडा ४ टक्के लाभ मिळवून देऊ,अधिक लाभ मिळवून देण्या सारख्या गोष्टी सांगीतल्यावर त्यांनी  रु 2 कोटी रुपये जमा केले होते तक्रारदाराला 38 लाख रुपये परत करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.


कोट,,,,,,,,

*अतिलोभ हे फसवणुकीचे कारण आहे*

जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी म्हणाले की, इच्छा हे दु:खाचे मूळ असून लोभ हे फसवणुकीचे कारण आहे.

असे मत त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आणि अशा ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहा, ऑनलाइन व्यवहाराबाबत पूर्ण जागरूक राहून एटीएम पिन, बँक खात्याचे तपशील विनाकारण कोणाशीही शेअर करू नका, अनधिकृत रोख कर्ज मिळवण्याचे प्रकरणात अडकून नका, अनोळखी व्यक्तींचे व्हिडिओ कॉल स्वीकारू नका. असे आवाहन जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी केले 

 

पत्रकार परिषदेला जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमण गौडा हत्ती, शंकर मारिहाळ, डीवायएसपी सुनिल कांबळे, सीपीआय रमेश आवजी इतर उपस्थित होते.