Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

युवा शक्तीच सशक्त राष्ट्र निर्माण करु शकतो - डॉ. जावेद जमादार

Responsive Ad Here


 युवा शक्तीच सशक्त राष्ट्र निर्माण करु शकतो - डॉ. जावेद जमादार 





विजयपुर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 स्वामी विवेकानंदांचे ' तुम्हीच तुमच्या कर्तृत्वाचे शिल्पकार आहात'हे वाक्य तरुणांना स्फूर्ती देणारा प्रेरणादायी शब्द आहे असे मत राष्ट्रीय पुरस्कार विजेते फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ जावेद जमादार यांनी व्यक्त केले 

शासकीय पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटी, युथ रेडक्रॉस सोसायटी विजयपूर येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय युवा दिन उत्सव सप्ताहाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना ते म्हणाले की, स्वामी विवेकानंदांचे जीवन जगासमोर आले आहे. एक देशभक्त , नेहमीच तरुणांना स्फूर्ती देणारे,भारतीय संस्कृतीचे देवत्व आणि महानता तरुणांमध्ये कोणती अद्भुत शक्ती दडलेली आहे, हे स्वामी विवेकानंदांनी जगाला दाखवून दिले. तरुणांनी स्वामी विवेकानंदांचा आदर्श अंगीकारून यशाच्या मार्गावर चालले पाहिजे, तरुणांना स्वामी विवेकानंदांच्या विचार, तत्वज्ञान आणि जीवन प्रेरित होऊन देशसेवा कार्यात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. 

 याच प्रसंगी डॉ.जमादार यांनी युवकांना आवाहन केले .

शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ सजिव कुमार चव्हाण व इतर व्यासपीठावर उपस्थित होते.