विजयपूर सुशोभीकरण व सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारांचे आवाहन
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
विजयपूर शहराच्या सुशोभिकरणासाठी जिल्हा प्रशासन पुढे आले असून त्यासाठी जनतेचे सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी टी भूबालन यांनी केले आहे
संदर्भात जिल्हाधिकारी टी. भुबलन यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यापाऱ्यांनी नियोजित ठिकाणी शिस्तबद्ध रित्या व्यवसाय करून सर्वत्र कचरा न सांडता कचरा कुंड्यांमध्ये जमा करून कचरा उचलणाऱ्या वाहनाला द्यावा, असे आवाहन केले आहे. शहरातील जनता बाजार, एमआर हॉटेल जवळ, के.एस.आर.टी.सी. डेपोजवळ, सैनिक स्कूल जिमखाना क्लबच्या मागे आणि इंडी रोड स्टेडियमजवळ खाद्यपदार्थ विक्री, भाजीपाला विक्रीसाठी नियोजित क्षेत्रांना भेट देऊन पाहणी केली. विजयपूर शहरातील पार्किंगच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक व महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून तोडगा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महानगरपालिका आयुक्त विजयकुमार मेक्कलकी म्हणाले की, महानगरपालिकेच्या व्यावसायिक भागात कचरा गोळा करण्याचे काम सुरू असून, जनता व व्यापारांनी कचरा रस्त्यावर फेकण्याऐवजी कचरा संकलन करणाऱ्या वाहनांना द्यावा. ते म्हणाले की, सर्व फुटपाथ विक्रेते आणि उद्योजकांनी व्यवसाय परवाना घेणे आवश्यक आहे.
महानगरपालिका, पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
