अभिनेते विश्वप्रकाश मलगोंड यांचा सत्कार
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
सिंदगी येथे कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने सिंदगी तालुका घटकच्या वतीने अभिनेते विश्वप्रकाश टी मलगोंड यांचा सत्कार करण्यात आला.
कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटना विजयपुर जिल्हाध्यक्ष नूतन पदाधिकारी व सर्व संचालक व सिंदगी तालुका कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सर्व संचालक यांचा शहरातील राजराजेश्वरी कल्याण मंगल कार्यालयात सिंदगी तालुका शिक्षक व सर्व विभागीय कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश सी षडश्याळ, सय्यद जुबेर एस केरुर, जगदीश सदाशिव बोळसुर, निजू एम मालिनकेरी, शंकर गौडा आर पाटील, नीला इंगळे, जयश्री बेन्नी, बी टी गौडार, रवींद्र प्रल्हाद उगार, अलमेला कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बिरदवी, रवींद्र गौडा आदी उपस्थित होते. आलमेल तालुका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवी बिरादार सिंदगी तालुका अध्यक्ष अशोक तेलुर , राजू नरगोडी, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

