Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

दुधनीत पहाटे पाच ते आठ पर्यंत विद्युत खंडीत करण्याचे कारण सांगावे ! - सुशिक्षित विद्यार्थी

Responsive Ad Here

 दुधनीत पहाटे पाच ते आठ पर्यंत विद्युत खंडीत करण्याचे कारण सांगावे ! - सुशिक्षित  विद्यार्थी 


विद्युत खंडीतमुळे दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना त्रास!






अक्कलकोट- येथील दुधनी शहरात रोज पहाटे पाच ते सकाळी आठ पर्यंत विद्युत खंडीत केले जाते, अद्याप कारण आजपर्यंत दुधनीतीलनागरिकांना कळले नाही. 

      दुधनी मध्ये आता पर्यंत 60 ते 70% पर्यंत केबलचे जोडकाम झाले असुन बाकीचे 30% केबलचे काम बर्याच दिवसांपासून स्थगित आहे. त्यामुळे दुधनीत अजुनही 40% लोक विज चोरी करतात; त्यातल्या त्यात मोठ मोठ्या दिग्गजांची विज चोरी मध्ये नावे असुन सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही. 

      

       सध्या दुधनी शहरात अनाधिकृतपणे विजेचा वापर जास्त होत असल्याचे कारण सुध्दा स्थानिक विद्युत कर्मचारी सांगतात, त्यामुळे विद्युत पुरवठा पहाटे खंडीत केले जाते असे कर्मचार्यांचे म्हणणे आहे. 

      कलम 135 नुसार दुधनीत मीटरची छेडछाड करणे, आकडा टाकुन विजेचा वापर करणे हे गरीबां पेक्षा   जास्तीत जास्त दिग्गजांचे घरात स्थानिक कर्मचार्यांनी करुन देतात ह्यांच्यावर वरिष्ठ अधिकारी कारवाई का करत नाहीत? तसेच मीटर रिडिंग घेणार्याला सुध्दा कोणाच्या घरात मीटर आहे किंवा नाही हे माहीती असुन देखील रिडिंग घेणारे तक्रार वरीष्ठ अधिकार्यांना देत नाहीत का? असे अनेक प्रश्न गावातील सर्व सामान्य जनतेकडून होत आहे. 



विद्युत कार्यकारी अभियंता ( जे ई ) यांनी पहाटे लाईट काढणायाचे कारण सांगावे- सुशिक्षित विद्यार्थी 


  सध्या मी बारावीत असुन अवघ्या काही दिवसात परीक्षा आहे, आमच्या पाठोपाठ दहावीच्या विद्यार्थ्यांचा देखील परीक्षा आहे. पहाटे पाच वाजता लाईट गेली की आठ पर्यंत लाईट येत नाही, आई पहाटे उठुन देवाला जाते भाऊ पहाटे उठुन सोलापूरला जाण्यासाठी स्टेशनला जातो, वडील शेताकडे जातो आम्ही 100% विज बिल भरुन देखील पहाटे काळोख्यात घरातील सर्वांनी बाहेर पडावे लागते. आम्ही अभ्यास कधी करावे व शाळेत कधी जावे या सर्व प्रश्नांची उत्तरे विद्युत अधिकारी यांनी द्यावे असे एका सुशिक्षित विद्यार्थींनी आग्रह केला आहे.