कर्नाटक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
विश्वप्रकाश मलगोंड यास "सर्वोत्कृष्ट अभिनेता" पुरस्कार
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी येथील अभिनेता-दिग्दर्शक विश्वप्रकाश टी मलगोंड यांना न्यू कर्नाटक फिल्म फेस्टिव्हल अकादमी आणि युनिव्हर्सल फिल्म कौन्सिलतर्फे आयोजित चौथ्या कर्नाटक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये "सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा" पुरस्कार देण्यात आला.
दिग्दर्शक एमए मुम्मीगट्टी, ज्येष्ठ कलाकार सुंदर राज, आंध्र प्रदेश फिल्म चेंबरचे अध्यक्ष अंबाटी मधु मोहन कृष्णा, कलमेश हावरीपेट यांनी रविवारी इसाटो री-क्रिएशन हब, व्हाईट फील्ड, बंगळुरू येथे आयोजित कर्नाटक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विश्वप्रकाश मालगोंड यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सन्मानित केले.
विश्वप्रकाश मलगोंड दिग्दर्शित ‘तुषार’ चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धेतही सहभागी झाला होता. चित्रपट महोत्सवात दीडशेहून अधिक चित्रपटांनी सहभाग घेतला.
याप्रसंगी केजीएफ सिनेमाचे गीतकार आणि दिग्दर्शक किन्नळ राजा, दिलीप कुमार, जम्मू काश्मीर जयेश गुप्ता, प्रभुराम रेड्डी, सुपरस्टार संपादक अस्लम, आनंद गुप्ता,
दिग्दर्शक, निर्माते सुनील कुमार, ज्येष्ठ कलाकार, अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माते, उद्योजक आदी उपस्थित होते. विश्वनाथ पल्लेद यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून शेवटी आभार मानले.
