श्री शिवाजी महाराज सोसायटीच्या वतीने विजय चव्हाण यांचा सत्कार
विजयपूर /प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जिल्ह्यात विविध संघटनांचे संस्थापक, मराठा समाजाचे नेते, प्रतिष्ठित व्यापारी आणि रिअल इस्टेट उद्योजक, तसेच सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग असलेले, गोरगरीब, दीनदुबळ्यांची मदत करण्यासाठी पुढाकार घेणारे विजयकुमार चव्हाण (पूजा टेलिव्हिजन), मराठा समाज अध्यक्ष, शिवाजी पेठ यांची कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद बंगळुरूचे नूतन राज्य उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल शहरातील प्रतिष्ठित श्री शिवाजी महाराज को.ऑप क्रेडिट सोसायटीच्या वतीने सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले
याप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष डॉ सदाशिव पवार, उपाध्यक्ष शंकर कणसे, संचालक मंडळाचे सदस्य बी.टी. तरसे, महादेव पवार, श्रीमती सरोजिनी निक्कम, मुख्य व्यवस्थापक संजय जाधव, विठ्ठल चव्हाण, अंबादास चव्हाण, कर्मचारी, पिग्मी एजंट, व इतर उपस्थित होते.
