ज्येष्ठ नागरिक संस्था, बेलापूर सभा संपन्न
मुंबई/ प्रतिनिधी- सुरेश पोटे
ज्येष्ठ नागरिक संस्था बेलापूर, नवी मुंबई ह्या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या विरंगुळा केंद्रात संपन्न झाली. या सभेस ज्येष्ठ नागरिकांचे अखिल भारतीय संघटनेचे माजी अध्यक्ष श्री दिगंबरजी चापके साहेब हे सभाध्यक्ष म्हणून विराजित होते. श्री चापकेसाहेब यांनी सदस्य वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत असे सुचवले एकूण ७३ सदस्य ह्या सभेस उपस्थित होते. तसेच फेस्कॉम या संघटनेचे मुंबई प्रादेशिक अध्यक्ष श्री सुरेशजी पोटे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी ज्येष्ठांचे व्यापक स्वरूपात संघटन कसे आवश्यक आहे या बद्दल विचार प्रकट केले.
संस्थेचे सदस्य आणि आनंदघन दिवाळी अंकाचे संपादक डॉ. देविदास पोटे यांनी जेष्ठानी वाचनाची आवड जोपासून मनाची मशागत आणि प्रगल्भता साधवी असे विचार व्यक्त केले. संस्थेचे जुने जाणते स्थानिक सदस्य श्री जनार्दन पाटील, श्री नारायण मुकादम, श्री महादेव मंगल पाटील, ह.भ.प. श्री मुरलीधर सोनटक्के ह्यांनी सभेत उस्फुर्त सहभाग घेतला. गायक श्री नारायण म्हात्रे, संस्था अध्यक्ष श्री नरेंद्र पोवळे, सचिव श्री मोहनलाल तेली, खजिनदार श्री रमेश कोळी,ज्येष्ठ सदस्य श्री. रवींद्र खुळे, श्री जगदीश मुकादम, श्रीमती माधुरी जोशी ह्यांनी सभेची नीट नेटकी व्यवस्था केली. सचिवांनी वर्षभराचा संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. सभेचे कामकाज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. सभेचे सुरेख असे सूत्र संचालन श्री नंदकुमार देशमुख यानी केले. अल्पोपहार आणि चहापान होऊन सभेची सांगता झाली.
