Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

सोलापूरात पांचाळ स्वाभिमान दिन साजरा

Responsive Ad Here

 

                      

         ब्रम्हश्री बाळशास्त्री क्षीरसागर जयंती 

                            व

       सोलापूरात पांचाळ स्वाभिमान दिन साजरा

 


पं. बाळशास्त्रीं क्षीरसागरांनी दीडशे वर्षांपूर्वीच मांडला विश्वकर्मा ब्राह्मणासाठी एकसंधतेचा विचार 





सोलापूर/ प्रतिनिधी 

सोलापूर येथील डी मार्ट जवळील तडकल इंग्लीश मिडीयम स्कुल येथे पांचाळ समाजाचे वतीने, पांचाळ स्वाभिमान दिन व ब्रम्हश्री बाळशास्ञी क्षीरसागर जयंती  साजरा करण्यात आला. 

     प्रथम ब्रम्हश्री बाळशास्ञी रावजीशास्ञी क्षीरसागर यांचे फोटो पुजन सराफ उद्योजक निलेश धाराशिवकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर पांचाळ समाजाचे बंधु- भगिनींना सत्कार करण्यात आला. तसेच ब्रम्हश्री बाळशास्ञी क्षीरसागर यांचे जीवन काळ बद्दल माहिती काशीनाथ पोतदार यांनी दिले ते पुढीलप्रमाणे; 

आपला समाज सुबुद्ध, सुसंघटित व बलिष्ठ व्हावा यासाठी विश्वकर्मा कुलोत्साह ह्या ग्रंथाच्या तेजस्वी शिकवणीने आपल्या समाजात अभूतपूर्व चैतन्य उत्साह व विचार जागृती उत्पन्न केली. समाजात अभिमानास्पद आचार विचाराची उत्क्रांती घडून आणली. निद्रिस्तांना जागृत केले आणि जागरूकांना प्रेरीत करीत ऊर्जितावस्थेतआणले. बाळशास्त्री यांनी विश्वकर्मा समाजातील अखिल बांधवांना संघटित करण्याचा प्रयत्न दीडशे वर्षापूर्वीच केला होता. आपण देवमान्य, सर्वाधिकारी, सर्वश्रेष्ठ ब्राह्मण आहोत ही जाणीव बाळशास्त्री व त्यांचे थोरले बंधू नारायणशास्त्री यांना होती. वेद आधारे सर्वास सप्रमाण या द्वयीनी करून दिली. अर्थात आपला हा सर्वश्रेष्ठ अधिकार बहुजना पुढे सुयोग्य ज्ञानार्जन करून व सद्वर्तन ठेवून स्वाभिमान पूर्वक वाढविला पाहिजे हे निर्विवाद आहे. अधिकार किंवा सन्मान हे केव्हाही मिळत नसतो तर तो कायिक, वाचिक, मानसिक, बौद्धिक व आर्थिक यथायोग्य कष्ट करून व झीज शोषूनच मिळवावा लागतो. अध्यात्म पारंगत नारायणशास्त्रींचा ग्रंथसंग्रह पाहून बाळशास्त्रींना त्यांचा ग्रंथसंग्रह वाढविण्याची इच्छा झाली व त्यांनी तो ग्रंथसंग्रह वाढविला आणि त्या ग्रंथसंग्रह बरोबर त्यांनी त्या ग्रंथांचा अभ्यास करून संशोधनही केले आणि अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले.  नीट संदर्भ लागत नाही.ब्रह्मर्षी बाळशास्त्री ज्या परिषदेचे ,महासभेचे ,संस्थेचे  अध्यक्ष होते त्या संस्थेची कामे त्यांनी व्यवस्थित पार पाडली. त्यांचा तिसरा गुण म्हणजे आशावादी पणा परिस्थिती कशी असली तरी ते चांगल्या प्रकारे हाताळत असत. वेदशास्त्रोत्तेजक पाठशाळा ब्रह्मर्षी नारायणशास्त्रीने सुरू केली होती ती त्यांनी पुढे चालू ठेवली आणि त्या शा ळेमध्ये नवचैतन्य निर्माण केले. विश्वब्रह्मवृत्ताची स्थिती हलाखीची होती तरीसुद्धा त्यांनी विश्वब्रह्मवृत्ताची आवृत्ती ही तशीच काढण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक खानेसुमारी च्या वेळी सेंसेस सुप्रिडेन्ट साहेब यांना आपल्या विश्वकर्मा ब्राह्मण समाजाबाबत ऐतिहासिक योग्य माहिती दिली. 1920 साली वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून जुने लोकमत व खरी माहिती  नमूद करून महत्त्वदर्शक प्यारा प्रसिद्ध केला. 

*पं. ब्रह्मर्षीची साहित्य संपदा* 

रथादिकरण, विश्वकर्मा पुराण या संस्कृत ग्रंथांचे मराठी भाषांतरासह "षोडष संस्कार रत्नमाला", वैदिकांना वैदिकी करण्यासाठी उपयोगी असणारा ग्रंथ लिहिला.  समाजाला धार्मिक शिक्षणाकरिता लागणारे ग्रंथ पोथ्या स्वतःच्या छापखान्यात छापून प्रसिद्ध केल्या, त्यामध्ये त्रिकालसंध्या, ब्रह्मयज्ञ, वैश्वदेव ,सार्थपूजा, विश्वकर्मा सूक्त, विश्वकर्माकुलोत्साह इत्यादींचा समावेश आहे.

जन्म :-

ब्रह्मश्री बाळशास्त्री यांचा जन्म शके 1798 शुद्ध नवमी सोमवार दिनांक 25 -12- 1876 रोजी झाला.

बाळशास्त्रींचा जन्म  आणि वडील पं. रावजी शास्त्री यांचे निधन हे एकाच वर्षी झाल्याने साहजिकच त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी वडीलबंधू ब्र. नारायणशास्त्री यांच्यावर आली. नारायणशास्त्री यांनी बाळशास्त्रींना संस्कृत व वेदाचे शिक्षण दिले. अशा महान व्यक्तीचे समाजाला स्मरण तसेच त्यांच्या कार्याची माहिती होण्यासाठी स्वाभिमान दिन साजरा केला पाहिजे.  याविचारातून समाज सुसंघटित होवून उच्चपदावर जाईल.

  म्रुत्यू;- 

दिनांक 5 ऑक्टोबर 1943 रोजी मंगळवारी पहाटे ब्रह्म मुहूर्तावर परलोकी प्रयाण.


बाळशास्त्री जन्माबाबत एक हकीकत आहे. पं. रावजीशास्त्री यांना नारायण शास्त्री नंतर दोन आपत्ते होऊन वारली. याकरिता रावजीशास्त्री यांनी अध्यात्म रामायणाच्या 108 अनुष्ठाने केलीत व त्यानंतर बाळशास्त्री सारखे तेजस्वी पुत्ररत्न प्राप्त झाले.

*धर्मशिक्षणाच्या प्रचारासाठी  संपूर्ण भारतभर भ्रमण*  

बाळशास्त्री ज्या भागात जात त्या भागांमध्ये तेथील भाषा ते अवगत करीत. संस्कृत, हिंदी, गुजराथी, कानडी, तेलगू , इंग्रजी अशा भाषा त्यांनी अवगत केल्या. प्रांतांप्रातांत ते विविध पंडितांची चर्चा करत त्या पंडित ,विद्वानां बरोबर ते संस्कृत भाषेत आपले विचार मांडत. प्रसंगी  भाषेचा अडसर आला तर ते दुभाषीची आधार घेत.


*साहित्यातून धर्म प्रचाराचे कार्य अखंडितपणे तेवत ठेवले* धर्म प्रचाराचे कार्य अखंडितपणे ब्रह्मश्री बाळशास्त्रींनी  केले. प्रामुख्याने विश्वब्रह्मकुलोत्सहाचे चार ते दहा भाग लिहून काढले.  ब्रह्मश्री नारायणशास्त्री यांनी एक ते तीन भाग लिहिले असून त्याचा सविस्तर विस्तार ब्रह्मश्री बाळशास्त्री यांनी केला. विश्वब्रह्मकुलोत्साहचे प्रमुख तीन भाग असून पहिल्या भागात श्रुती, स्मृती आणि ग्रंथाचा आधार अर्थासह दिले आहेत. दुसऱ्या भागात शंकराचार्य, मठाधिपती, आणि धर्म अध्यक्षांची संमती पत्रे दिली आहेत. तिसऱ्या भागात सरकारातून झालेल्या निवड कागदपत्रा विषयी माहिती दिली.  श्रीमंत पेशवे सरकार त्यावेळी नाना फडणीसांचा एक ठराव आणि मनोरंजक गोष्ट यामध्ये दिली आहे. विश्वब्रह्मकुलोत्साहची पहिली आवृत्ती आणि दुसरी आवृत्ती ही नारायणशास्त्रीने काढली. त्यानंतर तिसरी आवृत्ती बाळशास्त्री काढली. सन 1921 मध्ये विश्वब्राह्मणकुलोत्सहाची चौथी आवृत्ती बाळशास्त्रीने सचित्र काढली या आवृत्तीमध्ये केसरीकार, प्रबोधनकार, रावसाहेब कृष्णाची वझे, विठ्ठल रामजी शिंदे, प्राज्ञपाठशाळा,वाईचे अध्यक्ष नारायण शास्त्री मराठे, ब्राह्मण पत्रिकेचे मुंडले, ज्ञानकोशकार श्रीधर केतकर सारस्वत विचारवंत मान्यवराचे अभिप्राय आपणास दिसून येतात. बाळशास्त्री क्षीरसागर यांनी विश्वब्रह्मवृत्त हे मासिक सुरू केले सदर मासिक म्हणजे समाजकार्याचा वाहणारा निर्मळ झरा आहे. आपल्या समाजाचा पूर्वापार चालत आलेला ब्राह्मणधर्म त्यास अनुसरून आचार विचाराची वाढ व्हावी हा प्रांजळ हेतू. बहुजन समाजाच्या शिल्पकलेला उर्जितावस्था प्राप्त व्हावी, तसेच कालमानानुसार आर्थिक परिस्थिती व्यापार, व्यवसाय, सुधारणा

इत्यादी गोष्टींचा अवलंब समाजाने अवश्य करावा असा विचार त्यांनी साहित्यपाठ, मासिकातून व भाषणातून दिला. आपल्या प्रकृतीवर प्रकाश टाकण्यासाठी शरीर माध्यम खलू धर्मसाधनम् याचाही प्रचार या मासिकात करत. हे मासिक त्यांनी अनेक हालअपेष्टा सोसून वाढविले आणि त्या मासिकाचा जवळजवळ  पंचवीस वर्ष प्रचार केला होता. 

*ब्रह्मश्री पं.बाळशास्त्री कामगिरी* 

▪️ सन 1894 मध्ये विश्व कर्मधर्म जीर्णोद्धार मासिक सुरू केले. 

▪️सन 1900 आष्टा जिल्हा सातारा येथे रुद्र स्वाहाकार ▪️ सन 1910 मध्ये विश्वकर्मा वृत्त मासिक सुरू केले. 

▪️सन1914 मध्ये श्री विश्व ब्राह्मण समाज कालिका मंदिर ट्रस्ट सोलापूर येथे श्री कालिका देवीची मूर्ती स्थापनेसह त्याचे मुख्य पौरोहित्य केले.

▪️सन 1919 सर्वे मुंबई यांच्याकडे समाजविषयक माहिती पुरविली .

▪️सन 1920 मध्ये पुणे येथील विश्वब्राह्मण परिषदेचे स्वागताध्यक्ष भूषविले. 

▪️नागपूर येथे सन 1921 मध्ये हिंदू धर्म परिषदचे अध्यक्ष 

डॉ. कुर्तकोटी शंकराचार्य यांच्याकडे सामाजिक माहिती पाठविली. 

▪️सन 1922 महाराष्ट्रीय ज्ञानकोशा करिता माहिती दिली. 

▪️सन 1927 मध्ये महादेवशास्त्री दिवेकर यांच्याकडे माहिती पुरविली. ▪️सन 1927 जांगिड ब्राह्मण तर्फे कमिशनमध्ये साक्ष दिली. 

▪️सन1928 मध्ये वऱ्हाड प्रांती दैवज्ञ ब्राह्मण परिषद एकता अध्यक्ष म्हणून निमंत्रण स्वीकारले. 

▪️सन 1929 वर्‍हाड प्रांतातील मध्ये रुद्र स्वाहाकार केला. ▪️सश1932 काशी येथे

अखिल भारतीय विश्वकर्मा ब्राह्मण महासभेचे  अध्यक्षपद भूषविले. 

▪️सन 1934 मध्ये दैवज्ञ ब्राह्मण समाजातर्फे कमिशनमध्ये साक्ष .

▪️सन 1935 मध्ये श्री क्षेत्र पंढरपूर येथे विश्वकर्मा याग घडवून आणला. 

▪️सन1937 मध्ये नारायण आश्रम गणेश पेठ येथे मोठ्या दिमाखात वैदिक पद्धतीत समारंभपूर्वक पं. बाळशास्त्री यांचा षष्ट्यब्दीपूर्ती समारंभात  त्यांना 

मानपत्र देण्यात आले.

    


 यावेळी भारतीय पांचाळ संघटना चे पदाधिकारी व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


काशिनाथ पोतदार

राष्ट्रिय अध्यक्ष तथा संस्थापक

संतोष सुतार

राष्ट्रिय उपाध्यक्ष

सौ . माधवी पोतदार

राष्ट्रिय सचिव तथा राष्ट्रीय महिला अध्यक्षा

विध्याधर क्षिरसागर

बाळशास्त्री चे वंशज

डॉ. दिपक पोतदार

सुनिल पंडीत

दिपक कुरुलकर

रामचंद्र पोतदार

स्वामीनाथ पोतदार अक्कलकोट

अशोक पाटिल