Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल , मोरोची येथे पत्रकार दिन साजरा

Responsive Ad Here

 ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल , मोरोची येथे पत्रकार दिन साजरा




नातेपुते प्रतिनीधी:

मोरोची तालुका माळशिरस येथील ‘दर्या प्रतिष्ठान’ संचलित “ ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल , मोरोची” या शाळेत आज सोमवार दिनांक 09 जानेवारी 2023 रोजी‌ नातेपुते परिसरातील विविध वर्तमान पत्रांचे संपादक, वार्ताहर , यांचा सत्कार पत्रकार दिनाचे औचित्य साधून करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला नातेपुते  येथिल जेष्ठ पत्रकार श्रीकांत बाविस्कर, लतिफ नदाफ यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती आणि दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी परिसरातील संपादक, वार्ताहर , विद्यालयाचे चेअरमन डॉ. दत्तात्रय निटवे सर प्राचार्य ताहेर शेख सर, उपप्राचार्य जिलानी आतार सर व्यासपीठावर उपस्थित होते.नंतर विद्यालयात उपस्थित सर्व पाहुण्यांचा विद्यालयाचे चेअरमन डॉ दत्तात्रय निटवे सर विद्यालयाचे प्राचार्य ताहेर शेख सर, उपप्राचार्य जिलानी आतार सर,व विद्यालयातील शिक्षक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुंदर अशी भाषणे दिली व पत्रकार कसा असावा याविषयी कविता सादर केली. यानंतर सुंदर अशा प्रकारच्या मुकनाट्याचे सादरीकरण करण्यात आले यामध्ये मोबाईल फोन चे दुष्परिणाम याविषयी माहिती दिली. तसेच यावेळी सहोदय CBSE इंटर स्कूल जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बुद्धीबळ, गोळा फेक, सॅक रेस,रनिंग, कबड्डी या खेळात उत्तुंग असे यश संपादन केले त्यांचा सन्मान उपस्थित सर्व पत्रकार बंधु डॉ.निटवे सर व शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आला.सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक मा. समीर पठाण सर यांचे मार्गदर्शन लाभले. यानंतर पत्रकारांनी मनोगत व्यक्त करतांना मोबाईल चे दुष्परिणाम या मुकनाट्याचे कौतुक केले.पुढे बोलताना ते म्हणाले ," पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. जी गोष्ट तलवारीच्या जोरावर  कधीच करता येत नाही ती गोष्ट  पेनाने करता येते एवढे सामर्थ्य पत्रकारीतेत आहे असे सांगितले.

तसेच शाळेविषयी बोलताना ते म्हणाले डॉ. निटवे सर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व सुविधा मिळाव्यात या उद्देशाने सर्व गोष्टींची पूर्तता केलेली आहे.  माळशिरस तालुक्यातील पहिले स्केटिंग ग्राऊंड तयार करण्याचे काम त्यांनी केलेले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षीका मराठी विभाग प्रमुख सौ. सुनंदा पवार मॅडम आणि हिंदी विभाग प्रमुख  गणेश राऊत सर यांनी कले.सदर कार्यक्रम विद्यालयाचे प्रिस्निपल ताहेर शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी साजरा केला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन डॉ.दत्तत्रय निटवे सर, सर्व पत्रकार बंधु  व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.