Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

श्री सिध्दरामेश्वर महाराज यांची अक्षता सोहळा हजारो भक्तगणांच्या उपस्थित संपन्न

Responsive Ad Here

 श्री सिध्दरामेश्वर महाराज यांची अक्षता सोहळा हजारो  भक्तगणांच्या उपस्थित संपन्न 






दुधनी- दि.14/01/2023



दुधनी येथील ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर महाराज यांची आज अक्षता सोहळा मानाच्या पाच नंदीध्वज व हजारोंच्या भक्तगणांच्या उपस्थित शांततेत संपन्न झाला. 

     पौराणिक कथे नुसार कुंभार समाजाची कन्या सिध्देश्वर महाराजांची भक्त होती आणि महाराजांसोबत विवाह करण्याची ईच्छा होती, पण महाराज योगीपुरुष असल्याने कुंभार कन्येला स्पष्ट नाकारले परंतु भक्तांची ईच्छा पुर्ण करण्यासाठी महाराजांनी आपल्या जवळील योग दंडाबरोबर विवाह करण्यास सांगितले आणि कुंभाराची कन्या त्या योगदंडाबरोबर लग्न करुन घेते तेव्हापासुन हा विवाह सोहळा सम्मती कट्ट्यावर महाराजांची योगदंड व कुंभार कन्येचा प्रतिकात्मक विवाह केला जातो. 

   सम्मती कट्ट्यावर सम्मती वाचन व मंगलाष्टके वेदमुर्ती श्री चन्नवीर पुराणिक, वेदमुर्ती ईरय्या पुराणिक तसेच वेदमुर्ती महेश बाहेरमठ यांनी केले, हा सोहळा दुधनीतिल मठाधीश श्री. म.नि.प्र. डाॅ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थितीत अक्कलकोटचे पी. आय. महेश स्वामी कमिटी चे अध्यक्ष चंद्रकांत येगदी, लक्ष्मपुञ पाटील, मल्लीनाथ म्हेत्रे, सातलिंगप्पा परमशेट्टी, गिरमलप्पा सावळगी, प्रभुलिंग पाटील, सिध्दाराम येगदी, शिवानंद माड्याळ, शिवानंद हौदे, माजी. कृ. उ. बा.समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, बसवराज हौदे, सिध्दाराम मल्लाड, हणमंत कलशेट्टी, मलकाजप्पा अंदेनी, निंगण्णा सोळसे शरणबसप्पा मगी दुधनीतील सर्व व्यापारी, व हजारोंच्या संख्येने महिला, पुरुष, चिमुकले आदी भक्तगण उपस्थित होते.