Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

सिंदगीजवळ कारची समोरासमोर धडक; दोघांचा म मृत्यू

Responsive Ad Here

  


सिंदगीजवळ  कारची समोरासमोर धडक; दोघांचा म मृत्यू









विजयपुर प्रतिनिधि - दिपक शिंत्रे 

जिल्ह्यातील  सिंदगी तालुक्यातील यरगळ गावाजवळ टाटा नेक्सॉन आणि मारुती सुझुकी या दोन कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

  दीपक चिक्कलगार आणि मस्तान शेख अशी मृतांची नावे आहेत. ते मारुती सुझुकी कारच्या पुढील सीटवरून प्रवास करत होते.

  मारुती सुझुकी कारमधील प्रवासी मुधोळ येथून कलबुर्गीकडे जात होते, तर टाटा नेक्सॉन कारमधील प्रवासी कलबुर्गी येथून हुबळीकडे जात असल्याचे सांगण्यात आले.

  प्राथमिक माहितीनुसार, कार चालवणाऱ्या मृत व्यक्तीच्या हातात गुटखा पुडी आढळल्याचे सांगण्यात येत आहे. गुटखा खाण्याच्या प्रयत्नात चालकाचे लक्ष विचलित झाल्यामुळे हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

  घटनेची माहिती मिळताच सिंदगीचे सीपीआय सुनील मूलिमनी, पीएसआय श्रीकांत कांबळे, एएसआय शिवलिंग बतगौडर तसेच पोलीस कर्मचारी मनोहर बडिगेर आणि भीमू लमाणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

या प्रकरणी सिंदगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.