*सोलापुरातील प्रवासी बस स्टॉपवरील भुरट्या चोरांचा बंदोबस्त करा!
स्वराज्य माहिती अधिकार संघटनेची शहर पोलिस आयुक्तांकडे मागणी !
सोलापूर /प्रतिनिधि
*सोलापूर शहरातील मुख्य बस स्थानक, रेल्वे स्थानक बस स्टॉप, विजापूर रोड वरील बस स्टॉप, रंगभवन बस स्टॉप, अक्कलकोट रोड पाणी टाकी बस स्टॉप आणि इतर प्रवासी बस स्टॉपवरील भुरटे चोर अक्षरशः धुमाकूळ घालत असून, सोने , पैशाचे पाकीट व मोबाईल चोरणाऱ्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून ग्रामीण प्रवाशांचे आणि भक्ताचे आर्थिक लूट थांबवून त्यांना दिलासा द्यावा* अश्या मागणीचे निवेदन *शहर पोलीस आयुक्त श्री राव यांना स्वराज्य पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने* दिली आहे.
*स्वराज्य पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दीपक जी कांबळे, संस्थापक तथा राष्ट्रीय मुख्य महासचिव कमलेश जी शेवाळे, विश्वस्त तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सौ. धनश्रीताई उत्पात यांच्या आदेशानुसार व विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख उमेश काशिकर यांचे मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य तथा सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा वेदपाठक यांच्या कुशल नेतृत्वाखाली सोलापूर शहर पोलीस आयुक्त श्री राव यांना सदर निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी विश्वस्त उमेश काशिकर, जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक, जिल्हा प्रभारी अमर शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष दीपक कुरुलकर, जिल्हा सचिव सुधाकर शहाणे, अक्कलकोट शहर अध्यक्षा श्रीमती मीराबाई बुद्रुक, उपाध्यक्ष हर्षद पंडीत, जिल्हा सरचिटणीस दत्तगुरु वेदपाठक, सो. जिल्हा कार्य. सदस्य संतोष पोतदार, मल्लिनाथ जमादार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
