अक्कलकोटकरांची तहान भागवा! टँकर बंद करून आठवड्यातून किमान एकदा नळाने पाणी द्या!!
*हिळ्ळी पाईपलाईन करा*
स्वराज्य माहिती अधिकार संघटनेची मागणी!
अक्कलकोट / प्रतिनिधि
*अक्कलकोट शहराला सध्या १७ ते २० दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत असून नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. आगामी १० महिन्याची भीषण पाणीटंचाई लक्षात घेता कुरनूर धरणातून पुरेसा पाणीपुरवठा करावा, अन्यथा टँकरने पाणी न देता हिळ्ळी ते अक्कलकोट ही बंद पडलेली पाईपलाईन नव्याने टाकून नळाद्वारे किमान आठवड्यातून एकदा पाणी द्यावे!* अशी मागणी स्वराज्य पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना, सोलापूर जिल्हाच्या वतीने करण्यात आली आहे.*
*या संदर्भात संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी एस . कार्तिकेयन, आमदार सचिन कल्याणशेट्टी, अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी व मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना लेखी निवेदन दिले आहेत.
*निवेदनात म्हटले आहे की, शहरातील बहुतांश घरांमध्ये केवळ ज्येष्ठ आई-वडील राहतात. त्यांची मुले नोकरी-व्यवसायानिमित्त परगावी आहेत. त्यामुळे आलेल्या टँकरमधून ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना पाणी भरून घेणे शक्य होत नाही. पावसाळा यायला अजून १० महिन्याचा अवधी असून. कुरनूर धरणात तेवढा पाणी साठा उपलब्ध होणार नाही.*
*उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होणार आहे. त्याच खर्चात अथवा कमी जास्त खर्चात हिळ्ळी ते अक्कलकोट नवी पाईपलाईन टाकून कायमस्वरूपी प्रश्न सुटू शकतो, असेही निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी विश्वस्त उमेश काशिकर, जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक, जिल्हा प्रभारी अमर शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष दीपक कुरुलकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्रकुमार रघोजी, जिल्हा सचिव सुधाकर शहाणे, अक्कलकोट शहर अध्यक्ष मीराबाई बुद्रुक, उपाध्यक्ष हर्षद पंडीत, जिल्हा सरचिटणीस दत्तगुरु वेदपाठक, सोलापूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिलीप क्षीरसागर, संतोष पोतदार, मल्लिनाथ जमादार आदी उपस्थित होते.
