दुधनी येथील शाळेत शाळाव्यवस्थापन समितीचे बैठक उत्साहात व खेळीमेळी वातावरणात संपन्न
दुधनी / प्रतिनीधी
दुधनी येथील जि.प.प्राथ. कन्नड मुलींची शाळेत माहे अक्टोबर महिन्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे बैठक सौ.जयश्री विलास पोतदार यांच्या अध्यक्षते खाली सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पुजनाने प्रारंभ झाला. सभेत शैक्षणिक विषयी भौतिक सुविधा,गुणवत्तावाढ,स्वच्छता, निटनेटकेपणा, शिष्यवृत्ती परिक्षेची तयारी,गणवेश,बुट पायमोजे,संबधित सर्वविषयावर सर्वांचे विचार विनिमय हसत खेळत व खेळीमेळी वातावरणात चर्चा झाली.सदर सभेत सौ.दुधनीचे नूतन नगरसेविका अंजनादेवी पाटीलयांनी प्रथमच सभेस हजर राहिल्यांने त्यांचे आदराचे सत्कार करण्यात आली. तसेच सौअश्विनी रोडगे यांच्ये उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आले या वेळी शिवराज मंदोलीकर, संजय चंडके,आनंद बाहेरमठ, विलास पोतदार,ज्योती अमाणे व शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.सभेचे आयोजन व प्रशासकीय सर्व माहिती मुख्याध्यापक सथा सभेचे सचिव .महादेव बासरगाव यांनी सांगीतली व संतोष जोगदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व समारोप केले.
