विजयपुर जिल्हा आदी बणजिग समाजाच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन बिज्जरगी यांची निवड
विजयपुर प्रतिनिधि - दिपक शिंत्रे
विजयपूर जिल्हा आदी बणजिग समाजाच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन गु. बिज्जरगी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली
या निवडीच्या वेळी समाजाचे
पदाधिकारी आणि ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते समाजाचे गौरव अध्यक्ष सुरेश गु. गचिनकट्टी, पी. के. चिंचली, सुरेश बी. परगोंडे, अशोक टेंगले आणि गंगाधर संबणी यांच्यासह अनेक मान्यवर समाज बांधव उपस्थित होते
या प्रसंगी बोलताना मल्लिकार्जुन बिज्जरगी म्हणाले, समाजबांधवांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास, प्रेम आणि आपुलकी याबद्दल आपण सदैव ऋणी राहू.
अध्यक्षपदाची जबाबदारी ही केवळ अधिकाराची जागा नसून समाजसेवेची पवित्र संधी आहे, असे मानून आपण कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजाची एकता व विकास, शिक्षणाचा प्रसार, युवकांची प्रगती तसेच गरीब आणि गरजू कुटुंबांच्या उन्नतीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
समाजातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन, युवकांचे सहकार्य आणि प्रत्येक सदस्याच्या पाठिंब्याच्या बळावर विजयपूर जिल्हा आदी बणजिग समाज अधिक सक्षम, संघटित आणि प्रतिष्ठित करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
समाजाचा सन्मान उंचावून भावी पिढीसाठी उज्ज्वल भविष्य घडविणे हे आपले सामूहिक ध्येय असावे. समाजबांधवांनी दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आपण सदैव प्रामाणिकपणे कार्यरत राहू, असे मल्लिकार्जुन गु. बिज्जरगी यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल समाजातील सर्व ज्येष्ठ, पदाधिकारी, सदस्य आणि उपस्थित मान्यवरांचे त्यांनी पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार मानले.
