Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

हुबळीत बहुभाषिक कविसंमेलन उत्साहात संपन्नता

Responsive Ad Here

 हुबळीत बहुभाषिक कविसंमेलन उत्साहात संपन्नता









हुबळी   / विशेष  प्रतिनिधी

कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, कलबुरगी आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र मंडळ सभागृह, क्लब रोड, हुबळी येथे रविवारी आयोजित करण्यात आलेला भव्य साहित्यिक सोहळा आणि बहुभाषिक कविसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवण्णा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण तसेच रोपट्याला जलार्पण करून करण्यात आली. धारवाड जिल्हा कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष लिंगराज अंगडी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष गुरय्या रे. स्वामी होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सी. आर. यरवीनतेलीमठ, प्रभाकर सलगरे आणि मिलिंद उमाळकर उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सी. आर. यरवीनतेलीमठ, डॉ. विजया तेलंग, डॉ. आशी, एस व्ही अय्यनगौडर, के. एस कौजलगी, डी. व्ही. अरवंदेकर सुमन आमटे,आणि मारुती तरसे यांचा स्मृतिचिन्ह, म्हैसूर फेटा, शाल आणि पाण्याची बाटली देऊन गौरव करण्यात आला.

या साहित्यिक सोहळ्यात प्रा. सुमन आमटे लिखित 'लाईफ ऑन व्हील' या मराठी पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर झालेल्या बहुभाषिक कविसंमेलनात एकूण ३४ कवींनी आपल्या दर्जेदार कविता सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. या कविसंमेलनात मराठी, कन्नड, हिंदी, उर्दू आणि मालवणी भाषांतील कवींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध भाषांतील काव्यसादरीकरणामुळे भाषिक ऐक्य, सांस्कृतिक सलोखा आणि साहित्यिक बंधुभावाचे दर्शन घडले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभाकर सलगरे, मिलिंद उमाळकर, डॉ. परमेश्वर पाटील सुमन आमटे, नागराज एस.तसेच परिषदेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित साहित्यप्रेमींनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत अशा बहुभाषिक साहित्यिक सोहळ्यांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.