Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

दुधनी-भीमनगर कन्नड शाळेत आषाढी वारीनिमित्त बाल दिंडी उत्साहात साजरा

Responsive Ad Here

 दुधनी-भीमनगर कन्नड शाळेत आषाढी वारीनिमित्त बाल दिंडी उत्साहात साजरा 






दुधनी /प्रतिनिधी - निंगप्पा निंबाळ 

अक्कलकोट तालुक्यातील 

दुधनी-भीमनगर येथील कन्नड शाळेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने आषाढी वारी बाल दिंडी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा पारंपरिक वेश परिधान करून टाळ, मृदुंग, भगवे ध्वज तसेच विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमांसह दिंडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "पांडुरंग हरी" या जयघोषांनी परिसर भक्तिमय झाला.


या कार्यक्रमाचे नेतृत्व मुख्याध्यापक श्री प्रकाश नाईक सर,श्री महेश गायकवाड सर 

श्रीमती लक्ष्मी देगाव मॅडम, 

श्रीमती अर्चना गवई मॅडम दिव्या बसवनकेरी मॅडम  यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसवराज जन्ना होते. यावेळी शिक्षणतज्ज्ञ तथा रिपाइं (आठवले)चे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा शिवयोगी झळकी, निंगप्पा निंबाळ, विश्वनाथ रेऊर, सम्राट झळकी आणि गीतेश तोरणकर सैदप्पा झळकी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी अभंग,भजन आणि संतवाणीने गायन केली. सह शिक्षिका अर्चना गवई,रिपाइं चे सैदप्पा झळकी व प्रभारी केंद्रप्रमुख महेश गायकवाड या मान्यवरांनी समयोचित भाषणे करुन विद्यार्थ्यांना संत परंपरेचे महत्त्व,आषाढी वारीचे परंपरा, संस्कार, शिस्त आणि सामाजिक ऐक्य या विषयी मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव, सांस्कृतिक जाणीव आणि सामाजिक मूल्यांची जोपासना होण्यास मदत झाली.


कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकांनी मोलाचे सहकार्य केले.