Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

बी. एम. पाटील पब्लिक स्कूलमध्ये जागतिक मातृदिन उत्साहात साजरा

Responsive Ad Here



 बी. एम. पाटील पब्लिक स्कूलमध्ये जागतिक मातृदिन उत्साहात साजरा







विजयपूर/प्रतिनिधी - दिपक शि्त्रे

शहरातील जलनगर येथील बी. एम. पाटील पब्लिक स्कूलमध्ये जागतिक मातृदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

  कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य विक्रम नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी प्रत्येक व्यक्तीच्या यशामागे आईचे आशीर्वाद, प्रोत्साहन, परिश्रम आणि त्याग दडलेला असतो. त्यामुळे अशा उपक्रमांच्या माध्यमातून मातांचा सन्मान व गौरव करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

  या कार्यक्रमात मातांसाठी विविध मनोरंजक स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध मनोरंजनपर सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली.

   यावेळी शाळेच्या वरिष्ठ समन्वयक जया गलगली, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.